शिक्षकाकडून 24 विद्यार्थ्यांना छडीने जबर मारहाण
वडसवित्री नगर येथील नागनाथ निवासी विद्यालयातील प्रकार, शिक्षकावर गुन्हा दाखल
परळी वैजनाथ : शिक्षकाने वर्गात जाऊन आठवीच्या विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली आहे. याबाबत संबंधित शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरातील वडसावित्री नगर भागात मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळ परळी वै. संचलित श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी त्याच शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण फड आठवीच्या वर्गात गेले असता विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात good morning सर म्हणल्याने फड यांनी विद्यार्थ्यांच्या हातावर छडीने जबर मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर रडत येत मुख्याध्यापक यांना झालेला प्रकार सांगितला असता याबाबत फड यांना जाब विचारला असता त्यांनी मोठ्या आवाजात good morning म्हणल्या कारणाने मारहाण केली असल्याचे सांगितले. संबंधित शिक्षकाने यापूर्वी ही असेच विद्यार्थ्यांना मारहाण तसेच अर्वाच भाषेत बोलण्याची घटना घडली असून फड यांना सांगूनही त्यांच्या वागण्यात काही बदल होत नसल्याने शालेय प्रशासन, विद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी परेशान आहेत...
या प्रकारची तक्रार मुख्याध्यापक यांनी अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांनी शिक्षकास विद्यार्थ्यांना मारहाण का केली अशी विचारणा केली असता त्यांनाही धक्काबुक्की केली अशी फिर्याद संस्थेचे अध्यक्ष भिमराव सातभाई यांनी दिल्यावरून शहर पोलिस ठाण्यात सशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर विद्यार्थ्याचे पालक शहर पोलीस स्टेशन मध्ये शिक्षका विरोधात तक्रार करण्यासाठी आले असता पोलिसांनी मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या हाताला जास्त मार लागल्याने त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प