सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळी तालुक्यात एका विवाहितेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी

अनेक दिवस बलात्कार केल्याची विवाहितेकडून तक्रार

Abhimanyu Phad
  • Nov 15 2022 7:18PM
परळी वैजनाथ :-परळी तालुक्यातील मौजे गुट्टेवाडी येथील एका विवाहितेच्या घरात घुसून एकाने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सदरील महिलेच्या फिर्यादीवरून बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी पेटकर मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे.

या बाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, मौजे गुठेवाडी येथील एका 26 वर्षीय महिलेवर फुलचंद सुंदरराव मुंडे रा. कोठरबन,तालुका वडवणी, जिल्हा बीड याने सदरील विवाहितेचा नवरा घरी नसताना रात्री  घराचा दरवाजा उघडायला लावून आणि घरात आतूनकडी लावून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तू जर कोणास सांगितलेस तर तुला व तुझ्या लेकराला जीवे मारून टाकील धमकी दिली. तसेच काही दिवस आरोपीने सदरील विवाहितेस मौजे कोठरबन येथे नेऊन अनेक वेळा बलात्कार केल्याचेही तक्रार विवाहितेने दिली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी फुलचंद सुंदरराव मुंडे यांच्याविरुद्ध सदरील महिलेच्या फिर्यादीवरून गुरनं 273/2022 कलम376,452,506भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सपोणी मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी पेटकर मॅडम या करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार