सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लावणी महाराष्ट्राची सेवेची कला असून ती आता राज्याच्या बाहेरही पोहोचत आहे : फुलचंद कराड

श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवाला न भूतो न भविष्यती प्रतिसाद

Abhimanyu
  • Sep 30 2022 1:42PM
परळी :-श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात गुरुवारी लावण्य तारका हा कार्यक्रम पार पडला.चंद्रमुखी सुंदरा, जरा खाजवा की,जरा सरकून बसा की नीट अशा एका पेक्षा एक सरस आणि ढोलकीच्या थापांचा कडकडाट व सोबतच शिट्टी आणि टाळ्यांचा झालेला निनाद हा लावण्या तारका कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान लावणी महाराष्ट्राची सेवेची कला असून ती आता राज्याच्या बाहेरही पोहोचत आहे असे मत भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांनी व्यक्त केले. लावणीला राजश्रय मिळाला आहे.लावणी महाराष्ट्र सह राज्याबाहेर गेली आहे. असे अनेक कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारोती मुंडे यांनी केले.

परळी शहरात श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सवात आयोजित कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन दिवसापासून कार्यक्रमाला स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. फुलचंद कराड हे नेहमीच दर्जेदार कार्यक्रम घेत असल्याने त्यांना व त्यांच्या मंडळाला नागरिकाकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.लावण्यतारका हा साटम प्रस्तुत कार्यक्रम गुरुवारी पार पडला. दुर्गा मातेचा जय...वैद्यनाथ प्रभू की जय ...खेळताना रंग बाई होळीचा... ढगाला लागली कळ ....मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा.... अशा एकापेक्षा एक सरस आणि प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या लावण्या यावेळी झाल्या.

फुलचंद कराड यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल बोलताना ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारोती मुंडे यांनी कौतुक केले. आपण चांगले कार्यक्रम ठेवले असून सर्वच कार्यक्रम यशस्वी होतील असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात फुलचंद कराड यांनी मी आपली सेवा करण्यासाठीच उभा असून भविष्यात सामाजिक प्रश्न सोडविताना असे सगळे काम व उपक्रम हाती घेणार असल्याचे ते म्हणाले.

     यावेळी साहेबराव फड, मारोतराव आंधळे, सरपंच अनिल गुट्टे, युवा नेते राजपाल कराड, विद्यावर्धिनी विद्यालयाचे जेष्ठ संचालक एम टी मुंडे, माऊली फड, प्रशांत कराड, रवी कराड, नितीन बदने, पिनू मुंडे, गणेश होळंबे,  सत्यपाल कराड, आदीसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार