सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आई जगदंबा फुलचंदकराड यांना उदंड आशीर्वाद देतील -पंकजाताई मुंडे

कुलस्वामिनीच्या जागराणे उत्सव गाजला- फुलचंद कराड

Abhimanyu
  • Sep 29 2022 2:46PM
परळी :-फुलचंद कराड यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान नेहमीच लक्षणीय आणि समाजासाठी काम करणारे असते. राजकारणात असूनही देवी उत्सवात सलग बारा वर्षे त्यांनी देवीची स्थापना करण्यासोबत मनोरंजनाचेही कार्यक्रम ठेवले असून आई जगदंबा त्यांना उदंड आशीर्वाद देतील. या शब्दात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दुर्गोस्तव आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. दरम्यान नवरात्र उत्सव हा देवीचा असतो. देवीची आराधना केल्यास प्रत्येकाला अपेक्षित यश मिळते. असे सांगत येत्या काळात फुलचंद कराड आयोजित दुर्गोत्सव परळी शहर आणि परिसराचा लोकोउत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. असेही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

   श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात आज जागर कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड तसेच श्रीहरी मुंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,डॉ. शालिनीताई कराड,
डॉ. बालासाहेब कराड डॉ.ज्ञानेश्वर घुगे,डॉ. सौ रंजना घुगे, एम.टी. मुंडे, नितीन ढाकणे,सुभाष सावंत, माऊली फड ,मुरलीधर मुंडे, ईश्वर कांदे, प्रशांत कराड, अंगद राख, साहस आंधळे उपस्थित होते. आपल्या भाषणात पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की देवीचा उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने परळी शहरात साजरा होत असल्याचे पाहून मनाला समाधान वाटले. फुलचंदराव कराड बारा वर्षापासून हा उत्सव आयोजित करून देवीची आराधना करता आहेत तसेच सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन ही करत आहेत. निश्चितच कराड यांचे हे प्रयत्न चांगल्या समाज निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील असेही त्या म्हणाल्या. हल्ली समाज माध्यमावर एकमेकांना ट्रोल करणे चालू असते. परंतु अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगला समाज घडवला जाईल असेही त्या म्हणाल्या.

आपल्या भाषणात फुलचंद कराड यांनी सांगितले की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी पहिल्या दुर्गोसवाचे उद्घाटन केले होते. त्यांचा आशीर्वाद आजही आपल्यावर कायम असून हा वारसा आपल्याला अजून पुढे चालवायचा आहे असे ते म्हणाले. तेरा वर्षापासून मी देवीची सेवा करतोय लोकसेवा ही करतोय खूप काम करायचे असल्याने सेनापतीला ताई आपण काही काम लावले पाहिजे असेही आवाहन फुलचंद कराड यांनी केले. भविष्यात हा दुर्गोत्सव यापेक्षाही मोठा करण्याचा आपला मानस आहे. तसेच येत्या काळात परळी शहरात व्यायामशाळा उभारणार असल्याचेही फुलचंद कराड म्हणाले. लावणी ही संस्कृती आहे म्हणूनच राज्यात लावणीचे कार्यक्रम होत असतात.लावणी केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यांच्या कलावंतासाठी तेवढीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.फुलचंद कराड परळी मध्ये दुर्गसवाच्या माध्यमातून चांगले काम करतात. अशी प्रतिक्रिया जेव्हा सामान्य नागरिक देतो तेव्हा मला आनंद वाटतो आज आपण येथे आलात याचाही मनापासून आनंद वाटतो असे पंकजाताई मुंडे यांना फुलचंद कराड म्हणाले.
      दरम्यान आज जागर कुलस्वामिनीचा या कार्यक्रमात विविध भक्ती गीते सादर करण्यात आली. गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विठ्ठल विठ्ठल, आई भवानी तुझ्या कृपेने, खंडेरायाचा जय जयकार, नवरी नटली, अशा विविध भक्ती गीतांनी नवरात्रीतला दुर्गोत्सव जागरणाने पार पडला.या कार्यक्रमास परळी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार