सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आई जगदंबे आमच्यावरील कृपेचा आशीर्वाद यापुढेही कायम ठेव सर्वांना संकटातून मुक्त कर- फुलचंद कराड

आज पासून मनोरंजन पर कार्यक्रमाला उत्साहात होणार प्रारंभ

Abhimanyu
  • Sep 27 2022 8:48AM
परळी:-कोरोना संसर्ग आजार आणि पाठोपाठ शेती व शेतकऱ्यावर आलेले संकट यातून आई जगदंबे आपण आम्हाला मुक्त केले आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या घरात आर्थिक सुबत्ता नांदु दे सर्वांचे जीवन सुखमय होऊन त्यांच्या घरात शांतता व प्रगती लाभू दे असे साकडे भगवान सेनेचे सरसेनापती तथा श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी देवी मातेला घातले. दरम्यान आज पासून सुरू होणाऱ्या दुर्गोस्तवातील सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन कराड यांनी केले. प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते दुर्गोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने मोंढा मैदानावर देवीची स्थापना करण्यात आली असून आज मंडळाचे अध्यक्ष तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमनताई फुलचंदराव कराड यांच्या हस्ते विधिवत पूजनाने घटस्थापना करण्यात आली. मागील बारा वर्षापासून आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असून परळीकरांची सेवा करण्याचे भाग्य आई जगदंबे मुळेच मला लाभले आहे. अनेक संकटांना दूर करण्यासोबत संकटाचा मुकाबला करण्याची ताकद आई जगदंबेने आम्हाला दिली आहे. कोरोनाचे दोन वर्षाचे संकट टळले असून शेती आणि शेतकरी नेहमीच अडचणीत असतो या पार्श्वभूमीवर आई जगदंबेने सर्वांच्या घरात सुख शांती लाभू असेही साकडे फुलचंद कराड यांनी दुर्गा मातेस घातले.

   भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गोस्तव 2022 साजरा करण्यात येत आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आणि सदस्य हा उत्सव अप्रतिम व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे फुलचंद कराड म्हणाले. यावर्षी केवळ मनोरंजन नाही तर सोबत सामाजिक प्रबोधन व्हावे या दृष्टीने अनेक कार्यक्रम आयोजित केले असुन आज 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते दुर्गोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. पहिल्याच दिवशी तेजश्री प्रधान यांच्या सह अर्चना सावंत यांचा सहभाग असलेला अप्सरा आली हा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्व परळीकरांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार