सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत

असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर

Abhimanyu
  • Oct 17 2021 8:26PM
परळी वैजनाथ :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती.

1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उत्तम कांदे,तालुका संघचालक डॉ.अजित केंद्रे व उपस्थित स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदना केली.या महोत्सवसाठी परळी तालुक्यातील स्वयंसेवक तथा राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळीत या वर्षी विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य पथसंचलन करण्यात आले.घोष पथकाने सर्वांचे लक्ष वेधले तर संचलनादरम्यान राष्ट्रप्रेमींनी ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.हे पथसंचलन औद्योगिक वसाहत सभागृह येथुन सुरू होऊन पुढे नाथ चित्र मंदिर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक,विद्यानगर,शंभू महादेव मंदिर,श्री गजानन महाराज मंदिर परिसर,जलालपूर रोड मार्गे औद्योगिक वसाहत येथे या संचलनाची सांगता करण्यात आली.या संचलनासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार