सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अधिक ऊर्जेने काम करीन - चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पक्षाने माझ्यावर सोपविलेली नवी जबाबदारी मला अधिक ऊर्जा देणारी असून पक्षाला अधिकाधिक लोकाभिमूख करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे या गोष्टींना माझे प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

Snehal Joshi
  • Jul 3 2020 9:45PM
भारतीय जनता पक्षाने माझ्यावर सोपविलेली नवी जबाबदारी मला अधिक ऊर्जा देणारी असून पक्षाला अधिकाधिक लोकाभिमूख करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे या गोष्टींना माझे प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. पक्षाने आजपर्यंत आपणास सोपविलेल्या प्रत्येक जबाबदारीचे मी प्रामाणिकपणे पालन केले आणि पक्षाची सेवा हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहीले आहे. या नव्या जबाबदारीमुळे मला अधिक व्यापकरित्या काम करण्याची संधी मिळाली आहे.कुठलाही राजकीय पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच मोठा होत असतो. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना या पक्षाने मोठे केले, याबद्दलची नम्र जाणीव याक्षणी मला प्रकर्षाने होत आहे. याच जाणीवेतून मी माझ्या नव्या जबाबदारीचे अत्यंत निष्ठेने पालन करीन, अशी भावनाही श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. हा महत्वपूर्ण विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री. अमित शाह, पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष श्री. जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार