सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शंकर पार्वती नगर श्री वाळकेश्वर मंदिराचे सौ उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

समाजात एकोपा होण्यासाठी प्रत्येक भागामध्ये मंदिरांचे जीर्णोद्धार होण्याची आवश्यकता: उषाताई गित्ते

Abhimanyu
  • Feb 3 2023 10:03PM
परळी (प्रतिनिधी) :- शहरातील शंकर पार्वती नगर भागातील श्री वाळकेश्वर मंदिराचे भूमिपूजन विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते संपन्न झाले.   यावेळी ,ह भ प.गुरुवर्य ह भ प गुरुवर्य प्रभाकर महाराज झोलकर यांचीही उपस्थिती होती .  यावेळी बोलताना उषाताई गित्ते म्हणाल्या की समाजात एकोपा होण्यासाठी प्रत्येक भागामध्ये मंदिरांचे जीर्णोद्धार होण्याची आवश्यकता असून मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून आम्ही सढल हाताने मदत करू असे यावेळी उषाताई गित्ते म्हणाल्या. तसेच  यावेळी बोलताना गुरुवर्य प्रभाकर नाना झोलकर म्हणाले की परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी जीर्णोद्वार केले होते असेच शंकर-पार्वती नगर भागातील नागरिकांनी जागृत असलेल्या श्री वाळकेश्वर मंदिराचे जीर्णोद्वार केले असून यामुळे नागरिकांना भगवंताची भक्ती करण्यासाठी प्रेरणा मिळेल असे गुरुवर्य प्रभाकर नाना झोलकर म्हणाले.   यावेळी नागरिकांनी मंदिरास सढळ हाताने मदत करावी असे महाराज म्हणाले
यावेळी दिलीप जोशी, प्रमोद परळीकर, प्रा. तानाजी देशमुख, नारायण सातपुते, आबासाहेब मोकासे, व्यंकटराव देशमुख, बाबासाहेब मुठाळ, लालासाहेब देशमुख, प्रकाश देशमुख, आबा मोकाशे, अभिजीत देशमुख, डॉक्टर आबासाहेब देशमुख, सुहास शिंदे, निळकंठ दराडे, वसंत आघाव विठ्ठल आघाव,मधुकर मुंडे, भास्कर जाधव, मनोहर घुगे बोंडगे सर, भास्कर जाधव,नंदु मोकाशे, गिरीधारी दहिफळे , सुर्य वंशी सर  शाम तपके, संजय देशमुख ईजि, व्यंकटराव देशमुख, वसंत कराड,  राजा खाॅन गुत्तेदार   मनोहर घुगे गालम, पंकज आघाव, बंडू तांदळे,  शैलेश नागुडे ,पोकळे साहेब,बारसलले,तपके काकु, रत्न प्रभा परळीकर मॅडम,शिल्पा खेडकर ,सुनंदा खेडकर, प्रभावती गीते ,सुरेखा भांगे ,लता माने शिवकन्या कावळे, कमल गोतावळे ,ज्ञानेश्वरी फड ,शिल्पा आघाव ,संजीवनी आघाव ,कावेरी वळसे ,मंजुषा वळशे ,गायत्री शिंदे संगीता शिंदे , सविता जगताप ,भारतीबाई ,मीराबाई भरडे, सुनिता देशमुख  ,प्रभावती गित्ते, सूर्यवंशी मॅडम, मिनाक्षी आघाव यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार