दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
नेहुल वारुळे, समीक्षा घुमे यांनी विद्यार्थ्यासह मराठमोळ्या गीतावर सादर केला नृत्यविष्कार
परळी (प्रतिनिधी):-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळावेगळा कलाविष्कार सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतामुळे प्रेक्षक अक्षरशा भारावून गेले होते.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते, मी होणार सुपरस्टार नेहुल वारुळे, समीक्षा घुमे, मुख्याध्यापक विठ्ठल तुपे, पोद्दार जम्बो किडच्या मुख्याध्यापिका सुरेखा तुपे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पोद्दार जंबो किड्स च्या विद्यार्थी विद्यार्थिनीं व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध गाण्यावर नृत्यसादर केले. देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा या गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर काळजाच सुप झाल... आरशाला रूप आल...,झिंग झिंग झिंगाट, आदिसह मराठमोळ्या लावण्या, लोकगीते, हिंदी गीते, आदिवासी गीते,पारंपारिक वेशभूषेत नृत्य अविष्कार सादर केला. यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी सादर केलेल्या गाण्याला टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली. सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गीतावर सर्व विद्यार्थ्यांसह नेहुल वारुळे, समीक्षा घुमे यांनी नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्या समवेत विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ. उषाताई गित्ते याही उपस्थित होत्या. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलन विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक आदि मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 22:17:28l
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प