सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 4 फेब्रुवारी देण्यात येणाऱ्या स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी दैनिक आदर्श गावकरीचे परळी तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे यांची निवड

निवड समितीने स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै. आदर्श गावकरीचे जगदीश शिंदे यांची निवड करण्यात आली असुन त्यांनी लिहलेल्या "तांडा वस्तीवरच्या शाळांना आणतात बंदी, गरिबांच्या लेकरांना कशी मिळणार संधी" या वृत्ताला हा पुरस्कार देण्यात येत आहे.

Abhimanyu
  • Jan 29 2023 5:17PM
मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण दिन व मूकनायक दिना निमित्य देण्यात येणाऱ्या  स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी जगदीश शिंदे यांची निवड करण्यात आली असुन 4 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य व व्याख्याते मा संकेत कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ पत्रकार अंबाजोगाईचे भूमीपुत्र जगदीश पिंगळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

   मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्या मार्गदर्शना खाली मागील 4 वर्षा पासुन परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे उल्लेखनीय काम सुरू असुन या वर्षी 4 फेब्रुवारी रोजी दर्पण दिन व मूकनायक दिन संयुक्त रित्या साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले असुन या कार्यक्रमाचे औचित्य साधुन देण्यात येेनाऱ्या विविध स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यातील पत्रकारा कडुन प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. बीड जिल्ह्यातील पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे या साठी निवड समितीने  स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै. आदर्श गावकरीचे जगदीश शिंदे यांची निवड करण्यात आली असुन त्यांनी लिहलेल्या "तांडा वस्तीवरच्या शाळांना आणतात बंदी, गरिबांच्या लेकरांना कशी मिळणार संधी" या वृत्ताला हा पुरस्कार देण्यात येत आहे.
या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व रोख रक्कम रु 1001/- असे आसुन हा पुरस्कार वितरण सोहळा 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता स्व. विलासराव देशमुख सांकृतिक सभागृह नगर परिषद येथे महाराष्ट्र शासनाच्या गड किल्ले संरक्षण समितीचे सदस्य व व्याख्याते मा संकेत कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख, केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार