सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नितीन ढाकणे व दीपक गित्ते यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारणीवर निवड,पत्रकार बांधवानी केले अभिनंदन

मागील तीन वर्षापासून पत्रकार नितीन ढाकणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे परळी तालुका संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते.

Abhimanyu
  • Jan 28 2023 11:11PM
परळी:- परळी येथील नवोदित निर्भीड पत्रकार नितीन ढाकणे यांची  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. व तरुण तडफदार पत्रकार दीपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नागपूर येथील बैठकीत ठराव घेऊन नुकतेच देण्यात आले आहे. पत्रकार नितीन ढाकणे व दीपक गित्ते यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

      नागपूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या झालेल्या बैठकीत ठराव घेऊन बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी पत्रकार नितीन ढाकणे व पत्रकार दीपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे नियुक्तीपत्र दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी देण्यात आले आहे. मागील तीन वर्षापासून पत्रकार नितीन ढाकणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे परळी तालुका संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. याचीच फलश्रुती म्हणून त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व शेखर उर्फ चंद्रभान कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी पत्रकार नितीन ढाकणे व पत्रकार दीपक गित्ते यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे. या निवडीचे परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवासह बीड जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार