सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळीतील वैद्यनाथ बँक कॉलनी भागात शहर पोलिसांनी पेट्रोलिंगची गस्त वाढवावी : विशाल मुंडे

शहरातील वैजनाथ बँक कॉलनी भागात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे

Abhimanyu phad
  • Jan 25 2023 7:44PM
परळी : परळी शहरातील परळी- अंबाजोगाई रोडवरील वैजनाथ बँक कॉलनीत गेली अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढत असल्याने या भागात शहर पोलिसांनी पेट्रोलिंग ची गस्त वाढवावी अश्या मागणीचे निवेदन आज परळी शहर पोलिसांना भाजपचे युवा नेते विशाल मुंडे यांनी दिले आहे.
 
सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील वैजनाथ बँक कॉलनी भागात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून, दिनांक 24 जानेवारी रोजी मध्यरात्री वैजनाथ बँक कॉलनी येथील सोडगीर यांच्या घराच्या चैनल गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न तीन ते चार चोरट्यांनी केला मात्र आजूबाजूच्या लोकांना लागलीच जाग आल्याने नागरिकांनी आरडा ओरड केली त्यामुळे चोरांनी तेथून लागलीच पोबारा केला तरी या कारणास्तव शहर पोलिसांनी बँक कॉलनी भागातील सर्वच भागांमध्ये व विशेषत वैजनाथ गॅस गोडाऊन च्या मागील बाजूस पेट्रोलिंग गस्त वाढवून नागरिकांना सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे युवा नेते विशाल मुंडे यांनी परळी शहर पोलिसांना दिले असून, या निवेदनावर बाबासाहेब ढाकणे, शिवाजी फड, अशोक चाटे, सारंग बदने,बंडू भांड, ,नारायण फड, संजय पाटोळे, भागवत शेप, मनोज भास्कर, भानुदास मुंडे, बि डी भास्कर, वेदांत मुंडे, बाळासाहेब मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार