सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळी शहरात फसवणूक व खंडणी वसुलीचे रॅकेट जोमात

फायनान्स, भिसी व सावकारकीच्या माध्यमातून अनेकांची मालमत्ता हडपण्याचे कटकारस्थान सुरू

Abhimanyu phad
  • Jan 24 2023 10:11PM
परळी :- शहरात फसवणूक, भिसी व खंडणी वसुलीचे रॅकेट जोमात सुरू असून फायनान्स भिसी व सावकारकीच्या माध्यमातून अनेकांना प्रतिष्ठित ,डॉक्टर,प्राध्यापक,शिक्षक,व्यापारी याना सावज करून त्यांची मालमत्ता हडपण्याचे कटकारस्थान केले जात आहे. सदरील प्रकारामुळे अनेक नागरिक व कुटुंब परेशान झाले आहेत.अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत तर अनेकांच्या संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. आर्थिक व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याने सावकारकीच्या जाचामुळे अनेकजणांना प्राणास ही मुकावे लागत आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परळी शहरात खाजगी फायनान्स, सावकारकी, भिसी याचे स्तोत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फायनान्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणे, वार्षिक, सहामाही, साप्ताहिक भिसी चालवणे यामधून सावकारकी करणे असे प्रकार परळी शहरात सर्रासपणे सुरू आहेत. परळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, आदी विविध क्षेत्रातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढून भिशीचे ग्राहक बनवून त्यांच्याकडून कोरे चेक व कोरे बॉण्ड्स घेतले जातात,व पैसे थकल्यानंतर त्या चेकचा वापर तोरल फायनान्स च्या माध्यमातून भरघोस रक्कम टाकून पैशाची मागणी केली जाते. त्यासाठी त्यांना धमकावले ही जाते. रस्त्याने अडवणे, कोर्टात खोट्या केसेस दाखल करणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार सतत घडत आहेत. आडत व भिसी आणि सावकारकीच्या माध्यमातून जमा केलेली कागदपत्रे मावेजा आदि खाजगी पतसंस्थेत जतन केले जातात. जेणेकरून कुठलीही त्याची वाच्यता होऊ नये. याचीही खबरदारी संबंधित सावकार घेत असून शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी डॉक्टर अधिक क्षेत्रातील लोक त्रस्त झाले आहेत. परळी शहरात विविध ठिकाणी प्लॉट्स, जमिनी, घरे, दुकाने इतर मालमत्ता गैर मार्गाने व धमकावून बळकावल्याने अनेकांना परळी सोडूनही जावे लागले आहे. काहीजणांना धमकावल्यामुळे बीपी शुगर,अर्धांगवायू सारखे अटॅक देखील येत आहेत. तर काहीजण आत्महत्येच्या मानसिकतेत जगत आहेत. पतसंस्थेत कर्ज मागणीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शन करून लवकरात लवकर कर्ज मंजूर करू असे म्हणून विलंब लावला जातो. नंतर फायनान्सद्वारे किंवा भिसीद्वारे किंवा वैयक्तिक पैसे देऊन त्याचे कित्येक पटीने मागणी करून फसवणूक केली जाते.
 
 
*संगणमत करून केली जाते फसवणूक*
जीवन महादेवआप्पा फडकरी व त्यांचे साथीदार पृथ्वीराज देशमुख उर्फ बबलू यांच्या संगनमताने तोरल फायनान्सच्या माध्यमातून परळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर इत्यादी क्षेत्रातील लोकांना भिशीचे ग्राहक म्हणून त्यांच्याकडून कोरे चेक, बाँड घेऊन त्यांना सावज करून धमकावून खोट्या केसेस करून त्यांची मालमत्ता हडपण्याचे कटकारस्थान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकाराला अनेक जण अक्षरशहा वैतागले आहेत तर अनेकांनी याविरुद्ध कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत.
@@@@@
 
*अशाप्रकारे केली जाते फसवणूक*
 
श्री. भिमाशंकर [जीवन] फडकरी, त्यांचे पिता श्री महादेवअप्पा फडकरी व त्यांचे मित्र श्री. पृथ्वीराज देशमुख हे बी.सी. चालवतात व तोरल फायनान्सच्या नावाखाली खाजगी सावकारकी करतात. एखादया बी.सी.च्या ग्राहकाने बी.सी. उचलल्यानंतर किंवा एखादया ग्राहकाला महिना ५ ते १० टक्याने व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यांचे कोरे चेकस व बॉण्डस घेऊन त्याचा दुरुपयोग करतात.
नगरपालिकेची दिशाभूल करून, बी.सी.च्या ग्राहकाच्या परस्पर त्यांच्या मालमत्तेची पी.टी. आर. कॉपी काढून त्यावर स्वतःच्या खाजगी तोरल फायनान्सचा बोजा चढवतात. एखादया बी.सी.च्या ग्राहकाने दिलेल्या कोरा बाँडवर त्याच्या मालमत्तेची नोटरी न करता इसारपावती टाईप करुन घेतात. एखादयाच्या बँक खात्यात स्वतः पैसे भरतात व खोटया सहया करुन त्याच्या दुस-या चेकने ते पैसे लगेच काढून घेतात व त्याच्या नावाने पैसे दिल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात त्या माणसाला परेशान करुन त्याची मालमत्ता हडप करण्याचे यांचे काही प्रयत्न यशस्वी झाल्याने यांनी आता तर सपाटाच चालू केला आहे. एकंदरीत, हे तिघे मिळून नगरपालिका, बैंक, पोलीस प्रशासन व कोर्ट यांची दिशाभूल करत आहेत.विशेष म्हणजे या कडे पोलीस प्रशासन गप्प का आहे हे कळत नाही यांच्या मालमत्ता व यांची मिळकत याची सांगड घालून तपासणी केली तर सर्व लूट केलेली बाहेर येईल असे खोटे चेक बॉण्ड्स व जमिनीची कागदपत्रे हाती लागतील 
 
 
 
फसवणूक झालेल्या लोकांची नावे व रक्कम पुढीलप्रमाणे
 
बीसी फायनान्स व सावकार की च्या माध्यमातून परळी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी डॉक्टर्स आदींचे कोरे चेक घेऊन त्यावर मनमानी रक्कम टाकून फसवण्यात आले आहे याप्रकरणी परळीतील न्यायालयात सुमारे 35 लोकांचे खटले चालू आहेत ती नावे पुढीलप्रमाणे. विनायक ट्रेडर्स 6 लाख 50 हजार,डॉ.शिवकांत अंदुरे एक कोटी 20 लाख, श्रीनिवास रणखांब 5 लाख रुपये शिवाजी जगताप 3 लाख, नर्सिंग दौंड 1 लाख पन्नास हजार,प्रशांत ढोले 2 लाख 40 हजार, सुनील केंद्रे 4 लाख 50 हजार, लक्ष्मीकांत क्षीरसागर 3 लाख, रवी रेवनवार 4 लाख, 50 हजार,गिरीश भिंगोरे 17 लाख,अरविंद गायकवाड 20 लाख, दयानंद कुरुडे,शाहिद शरयात,विनायक ट्रेडर्स, विजय लांडगे,आलिम हबीब खान,सॅमसंग मोबाईल शॉपी,आनंद जय अग्रवाल, राहुल डोंगरे, संतोष कोपरे,निखिल लोहिया,शंतनु बारस्कर,बालासाहेब सातपुते, रमेश आश्रुबा माने, अथर्व मल्टी सर्विसेस, गणेश रेडीमेड, अमित भांगे, माजीत, कुलदीप शेप आदीसह अनेकांची फसवणूक झाली आहे.
 
 
अटक वॉरंट असूनही अद्याप अटक का नाही?
 
जीवन महादेवआप्पा फडकरी याच्यावर दि.28/01/2022 रोजी कलम 138 नुसार अटक वॉरंट असूनही अद्याप त्याला पकडून हजर केलेले नाही. यामागे काय गोड बंगाल असावे? तसेच स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध पृथ्वीराज रघुनाथ देशमुख भीमाशंकर महादेव आप्पा फडकरी सुनील श्रीरामअभय अनिल बळवंत यांच्यावर कलम 448, 427, 506, 34 भादविप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार