डॉ. शिवकांत अंदुरे यांच्या पत्नीला मारहाण झाल्यानंतर शहरातील महिला आक्रमक
वीरशैव समाजाच्या महिलांच्या वतीने परळी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदन
परळी:शहरातील भागवत मंगल कार्यालय शेजारी डॉक्टर शिवकांत अंदुरे आणि त्यांच्या पत्नीस जीवन फडकरी व काही अज्ञात मुस्लिम महिलांनी मारहाण केली होती. याप्रकरणी महिलांच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील विद्यानगर भागात राहणारे डॉ. शिवकांत अंदुरे आणि त्यांच्या पत्नीस नाथरोडवरील भागवत मंगल कार्यालय शेजारी जीवन फडकरी व इतर मुस्लिम महिलांकडून मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी परळी शहरातील महिला आक्रमक झाल्या असून वीरशैव समाजाच्या महिलांच्या संघटनेच्या वतीने परळी शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात महिलांनी असे म्हटले आहे की, डॉ शिवकांत अंदुरे यांच्या काही वैयक्तीक व्यवहारासंबंधी डॉ अंदूरे यांच्या दवाखान्यासमोर डॉ.अदूरे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्या गेली. इतर समाजाच्या महिला येवून डॉ. अंदूरेच्या पत्नीला मारहाण करुन अपहरण करण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. याचाआम्ही जाहिर निषेध करीत आहोत तसेच या महिला कोण होत्या? त्यांचा या सर्व गोष्टिंशी काय संबंध होता?या गोष्टीचा तात्काळ तपास व्हावा अशी मागणी समस्त वीरशैव समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर श्रीमती मंगल गुळवे, मनिषा चौंडे, शारदा चौंडे, अर्चना बुद्रे, श्रद्धा स्वामी, सारिका हालगे, महानंदा हलगे,नीता सोनवळे, महादेवी बुरांडे,सुनिता रोडे, अनुराधा बुद्रे, रेखा चौधरी, सुनिता खोत, उमा समशेट्टी, माजी नगराध्यक्षा हालगे सरोजिनी, सुरेखा मेनकुदळे, मंगल देशमाने, मंगल गुळवे,गोदावरी हलगे, विमल हरगुले,प्रणिता महाजन, शांता बिराजदार, चौधरी अनघा, मंगल झाडे, शुभांगी मंदोडे , शिवानी वारद, जयदेवी पोपडे, पूजा पोपडे, उषा मुतंगे, आशा वाडीवाले, अनिता कापसे , संगीता कापसे, विमल कुरे, रंजना बर्डे, लता थोटे, जयश्री भूमकर, सुनिता काळे , सुनंदा काळे, अर्पिता स्वामी, वैष्णवी स्वामी, सुरेखा गुजर, शिवकन्या स्वामी, ज्योती बुद्रे, अर्चना स्वामी, वंदना स्वामी, सविता खोत, जयश्री खोत, सिंधुबाई बुद्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प