सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची कु.सेजल गायकवाड विद्यार्थिनीला परभणी येथे मिळाली 'पिको सॅटॅलाइट' बनवण्याची संधी

२२ जानेवारीला कार्यशाळा झाली तर, १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण

Abhimanyu Phad
  • Jan 23 2023 11:04PM
परळी : 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल - फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम्' आयोजित आणि स्पेस झोन इंडीया, मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने "डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३" साठी बीड, औरंगाबाद , परभणी जिल्ह्यातील विविध शाळामधील विद्यार्थ्यांना 'पिको उपग्रह (satellite)' बनवण्याची संधी मिळाली आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील पट्टीपुरम येथून देशभरातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे १५० पिको सॅटॅलाइट पुन्हा वापरता येणाऱ्या किटच्या साह्याने अवकाशात सोडले जाणार आहेत. यासाठी देशभरातील ५००० विद्यार्थ्यांनी ऑनलाईने प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी कु सेजल चंद्रकांत गायकवाड ( वर्ग -8 वी) हिने घेतले आहे.
 
या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती आँचल गोयल ,मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव ,शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आदी मान्यवर उपस्थित होते . देशाला भविष्यात लागणारे शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या कार्यशाळेतून मिळतील असा आशावाद जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.
 
नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 22 जानेवारी रोजी परभणी येथे एकदिवसीय विभागीय कार्यशाळेत विद्यार्थ्यानी पिको सॅटेलाइट प्रत्यक्षरित्या बनवले आहेत. त्यानंतर देशभरातून स्पर्धेत क्षमता सिद्ध केलेल्या १०० मुलांची निवड केली जाईल. निवड झालेले है विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रकिट बनविणार आहेत. या उपक्रमाची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ' तसेच जागतिक पातळीवरील इतर पाच संस्था घेणार आहेत. अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे
जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषाताई चौधरी यांनी दिली. तसेच मराठवाडा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य श्रीरंग औचरमल, बीड जिल्हा समन्वयक चंद्रकांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सदर विद्यार्थिनीला कार्यशाळेसाठी बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार साहेब,जिल्हा प्रा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी,परळी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी एन व्ही सोनवणे,शाळेच्या अध्यक्षा सौ उषा किरण गित्ते मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री विठ्ठल तुपे सर यांनी कु सेजल चंद्रकांत गायकवाड हिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार