सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाची शहरातील वडसावित्री नगर भागात कारवाई

सतरा हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा केला जप्त; पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार

Abhimanyu phad
  • Jan 22 2023 2:46PM
परळी वैजनाथ : परळी शहरातील वडसावित्री नगर भागात सहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाने छापेमारी करत गांजा जप्त केला असून याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परळी शहर मागील काही महिन्यांत अवैद्य धंद्याचे केंद्र बनले असून पोलीस प्रशासन मात्र केवळ काठ्या बडवण्यात धन्यता मानत आहे,अशी नागरिकांमध्ये भावना झाली आहे.
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार परळी शहरातील वडसावित्री नगर भागात गांजा असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव येथील पोलीस उपनिरीक्षक बोडखे,कांबळे, पोलीस हवालदार राठोड, देशमुख, राऊत, महिला पोलीस नाईक ढगे, पोलीस कॉन्स्टेबल भिसे यांनी वटसावित्री नगर भागात राहणाऱ्या संतोष दगडोबा मस्के वय वर्षे 42 राहणार वडसावित्री नगर परळी वैजनाथ यांच्या घरावर दिनांक 21/1/2023 रोजी दुपारी चारच्या दरम्यान छापा मारला असता म्हस्के यांच्या घरातील जनावराच्या पत्र्याच्या गोठ्यामध्ये लोखंडी बॅरल मध्ये प्लास्टिकच्या पिशवीत एकूण 1.735 किलोग्राम वजनाचा गांजा मिळाला ज्याची किंमत 17350 रुपये असून हा गांजा मस्के याने बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी ठेवून पोलिसांची दिशाभूल केली तसेच धीरज कुमार यांचे पथक आल्याची चाहूल लागतात तो निघून गेला म्हणून बालक पांडुरंग कोळी, व्यवसाय नोकरी पोलीस निरीक्षक, नेमणूक पोलीस स्टेशन माजलगाव यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 कलम 8(B) 20 प्रमाणे गुंगी कारण औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 नुसार संतोष दगडुबा मस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.
 
*घटनास्थळी परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ होते उपस्थित*
 
सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाने परळी शहरातील वडसावित्री नगर येथील घरावर छापा टाकला असता घटनास्थळी परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ देखील उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार