सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवैध ऑनलाइन बिंगो मटक्या संदर्भात संपादक व पत्रकारांच्या निवेदनाला स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष ; सहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाने केली कारवाई

बिंगो ऑनलाईन मटक्यावर केलेल्या कारवाईमुळे डॉक्टर धीरज कुमार यांच्या पथकाचे शहरातील नागरिक करत आहेत कौतुक

Abhimanyu
  • Jan 15 2023 10:54PM
परळी :- सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने परळी शहरात मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच ठेवला आहे. दि.15जानेवारी 2023 रोजी परळी शहरात सुरू असलेल्या बिंगो ऑनलाईन मटक्यावर कारवाई करत एक लाख तीस हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सदरील बिंगो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यापूर्वीच परळीचे संपादक व पत्रकाराच्या वतीने ही ऑनलाईन बिंगो मटक्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. परंतु स्थानिक पोलिसांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार  यांनी केलेल्या कारवाईमुळे बिंगो चालकावर संक्रात आल्याने अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग माजलगाव अतिरिक्त पदभार अंबाजोगाई डॉ. बी. धीरजकुमार यांनी अंबाजोगाई उपविभागातील समस्या व तक्रारीची प्रथम प्राधान्याने परळी शहरामध्ये चालणारे अवैद्य धंद्याची माहिती गोपनिय बातमीदार मार्फत हस्तगत करून परळी शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो मटक्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रवि शंकरराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन आरोपी संतोष रोहिदास हाळने, रमेश मानिक कुरे, गणेश तन्हाजी आव्हाड,अफताफ सत्तार शेख,अब्दुल नसीर सैयद,जाबेर करीम सैयद,शेख सिरातल मोहम्मद नूर मोहम्मद, अपमाश फयाजोद्दीन शेख, सय्यद आफताफ हुसेन,गोविंद सुशील आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 17/2023 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वय फिर्याद दिली आहे. वरील 10 आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचकडून नगदी रक्कम व मोबाईल, कॉम्प्युटर, सी.पी.यु सह एकूण 1लाख 30,470/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावुन उत्तजनार्थ कामगिरी केली आहे. बिंगो ऑनलाईन मटक्यावर केलेल्या कारवाईमुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार  यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. दरम्यान अशाच प्रकारच्या कारवायाचा धडाका या पथकाने सुरूच ठेवावा असेही जनतेतून बोलले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार