सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भोजनकवाडीत मतदान का केले नाहीस म्हणून एका महिलेस शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Abhimanyu phad
  • Jan 13 2023 10:22PM
परळी :- परळी तालुक्यातील मौजे भोजनाकवाडी येथे एका महिलेस तू आम्हाला मतदान केले नाहीस असे का म्हणालीस म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सदरील महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की परळी तालुक्यातील मौजे भोजनकवाडी येथे गोपाळ बामाजी फड यांच्या पत्नीस आरोपी गुणराज राम होळबे, महेश राम होळंबे, परमेश्वर विष्णू होळंबे,अभय श्रीधर होळंबे, शरद गणपत आंधळे, शिवमल्हार अंकुश होळंबे, दीपक होळंबे सर्व रा. हेळंब ता. परळी , जिल्हा बीड यांनी आम्ही तुम्हाला मतदान केले नाही असे म्हटल्यावरून घरासमोर लाथाबुक्यानी मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदरील महिलेचे पती गोपाळ फड फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 11/ 2023 कलम 143,323, 504, 506 भादवी नुसार 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बडे हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार