सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती ; जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे उजळणार भाग्य

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील ९४ कोटी ०७ लक्ष रुपयांच्या प्रस्तावित रस्त्यांना मंजूरी

Abhimanyu
  • Jan 13 2023 4:27PM

बीड । दि. 13 ।
राज्यातील ग्रामीण रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अध्यक्षेतखाली दिल्ली येथे नुकतीच महाराष्ट्रातील लोकसभा सदस्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील प्रस्तावित रस्ते पुनश्च सादर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्यांच्या या मागणीला मोठे यश आले असून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चौऱ्याण्णव कोटी सात लक्ष रुपयांच्या निधीला केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना फिटावी आणि नागरीकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्याकरिता खा.प्रितमताई मुंडे या नेहमीच प्रयत्नशील असतात , त्यांच्या याच प्रयत्नांच्या फलश्रुतीची जिल्हावासीयांना पुन्हा एकदा अनुभूती आली आहे.   बीड जिल्ह्यातील प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी केल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने गेवराई,बीड, केज, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, धारूर,माजलगाव आणि वडवणी तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे.

*जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : खा.प्रितमताई मुंडे*

ग्रामीण भागाला जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांशी कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रलंबित आणि प्रस्तावित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहे, जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करून नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय दूर करण्यावर मी लक्ष्य केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि नागरीकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात याकरिता मी कटिबद्ध आहे, येणाऱ्या काळात रस्त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहेत, त्यादृष्टीने पाठपुरावा देखील सुरू असल्याची माहिती  खा.डॉ.प्रितमताई मुंडे दिली. तसेच बीड जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह, राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे आभार ही त्यांनी मानले.

••••

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार