सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या पथकाची परळीत अवैध धंद्यावर कारवाई

शहरातील अवैध मटक्याच्या अड्ड्यावर छापेमारी करत 31 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Abhimanyu phad
  • Jan 12 2023 8:32AM
परळी : परळी शहरात सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या पथकाचे अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरूच असून आज अंबाजोगाई उपविभागातील सामान्य नागरिकांच्या तक्रारीला प्रथम प्राधान्य देत धीरज कुमार यांच्या पथकाने गोपनीय बातमीदार मार्फत माहिती हस्तगत करत परळी शहरातील मटका जुगार खेळणारे व चालवणारे यांच्यावर कारवाई केली.
 
सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाने परळी शहरातील विविध भागात कारवाई केली असून आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1) बिबन शबीर पठाण, राहणार भोईगली परळी 2) सयद जाबेर सयद अब्दुला, राहणार पालम जि परभणी 3) शेख असीफोदीन शेख जमीरोदीन राहणार मलीकपुरा यांचेकडून 11770/- रुपये मोबाईल व नगदी रक्कम तसेच पोस्टे परळी शहर गुरंनं 12 /2023 कलम 12 अ मुंबई जुगार मधील आरोपी विश्वनाथ शिवाजीराव चव्हाण राहणार पंचशिलनगर परळी यांचे ताब्यात नगदी 100/- रुपये 2) तुकाराम सखाराम बहीरे राहणार कन्हेरवाडी यांचे ताब्यात एक मोबाईल व नगदी 480/- रुपये तसेच आरोपी गणेश ज्ञानोबा फड राहणार कन्हेरवाडी यांचे ताब्यात 800/- रुपये असा एकूण 2390/- रुपये व मुददेमाल तसेच पोस्टे संभाजीनगर गुरंनं 9/2023 कलम 12 अ मुबई जुगार कायदा मधील आरोपी सय्यद इब्राहीम सय्यद सादेक राहणार इस्लामपुरा बंगला परळी यांचे ताब्यात नगदी 4470/- रुपये तसेच पोस्टे संभाजीनगर गुंरंनं10/2023 कलम 12 अ मुजुका प्रमाणे आरोपी नामे वैजनाथ पंढरी • लांडगे, राहणारा मिलींदनगर परळी यांचे ताब्यात एक मोबाईल 1000/- रुपये किमतीचा व नगदी 1000/- रुपये तसेच आरोपी गंगाधर सखारामजी सिरसाट राहणार घोडागौडगांव यांचे ताब्यात नगदी 300/- रुपये व मोबाईल 10,000/- रुपये असे एकूण 10300 रुपये मिळून आले. असून सदरील छाप्यात पथकाने एकूण चार मोबाईल व नगदी रकमेसह एकूण 31 हजार आठशे वीस रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल व मोबाईल जप्त केला असून सदरील कारवाई सहायक पोलीस अधीक्षक डॉ. श्री बी धिरज कुमार, अतिरिक्त पदभार उपविभागीय पोलीस अधीकारी अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोपणीय बातमीदारा मार्फत माहिती घेऊन केली असून सहायक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड, पोह 1399 सांगवे, पोह 1620 गुटटे, पोना 2011 खेलबुडे, पोह 613 सौंदनगर यांनी छापा टाकत सदर छाप्यात एकूण चार मोबाईल व नगदी रकमेसह एकूण 31820/- रुपयाचा जुगाराचा मुददेमाल व मोबाईल जप्त केला असून परळी शहरातील अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईमुळे धीरज कुमार व त्यांचा टीमवर परळी शहरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार