सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळीत अवैध धंद्यांना ऊत;परळीचे पोलीस करतात काय?

डीवायएसपी धीरजकुमार बच्चू यांच्या कारवाईने अनेकांचे पित्त खवळले

Abhimanyu
  • Jan 11 2023 10:56AM
परळी:-परळी शहर व तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असून या अवैध धंद्यांना स्थानिक पोलिसांचे अभय असल्यानेच पोलीस कारवाई करीत नसल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.परळी शहर व तालुक्यात ऑनलाईन बिंगो मटका, गावठी दारूची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे विक्री, पत्याचे क्लब आदि अवैध धंदे बोकाळले असून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत.परंतु परळीच्या पोलिसांना याचे काही देणे घेणे राहिले नाही.केवळ चिरिमिरीसाठी गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. परळीचे पोलीस अवैध धंद्यावर कारवाई का करत नसतील यामागे काय गोडबंगाल असावे? असेही चर्चा नागरिकात होत आहे. दरम्यान या अवैध धंद्याविरोधात दि. 9 जानेवारी 2023 रोजी अतिरिक्त सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने परळी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडी टाकले आहेत. या धाडी टाकल्याने या अवैध धंद्यात सहभागी असलेल्या अनेकांचे पित्त मात्र खवळले आहे. जर पोलीस अधीक्षकांचे पथक परळीत येऊन अवैध धंद्यावर कारवाई करत असेल तर परळी शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करतात काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे?
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संभाजीनगर,परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून पत्त्याचे क्लब ,बिंगो गुटका अवैध दारू विक्री,चोऱ्या आदि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या अवैध धंद्याकडे परळीच्या पोलिसांनी पाठ फिरवली असल्यानेच तसेच पोलीस निरीक्षक यांचे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचेही नागरिकात बोलले जात आहे. यामागे काय गोडबंगाल आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पत्याचे क्लब व ऑनलाइन बिंगो मटका यामुळे अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. केवळ चिरीमिरी साठी गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी पोलिसांच्या या भूमिकेमुळे होत आहे. दि. 9 जानेवारी 2023 रोजी रोजी अंबाजोगाई चे प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व त्यांच्या पथकाने शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक अवैध धंद्यावर कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून या अवधी धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अनेकांचे पित्त मात्र या कारवाईमुळे खवळले आहे.
 
*धीरजकुमार बच्चूंनी कारवाया कराव्यात -नागरिकांची मागणी*
 
परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे वाढले आहेत. याबाबत परळीचे पोलीस कारवाया करीत नाहीत. केली तर केवळ थातूरमातूर कारवाई करून सोडून दिले जाते.यामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने परळीत येऊन अवैध धंदेवाल्या विरोधात कडक कारवाया कराव्यात अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार