सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळीत दोन दिवशीय पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अ.भा मराठी पत्रकार परिषद व व उपजिल्हा रुग्णालय परळी यांचा संयुक्त उपक्रम

Abhimanyu
  • Dec 13 2022 7:09PM
परळी,(प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 12 व 13 डिसेंबर 2022 रोजी परळी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पत्रकार बांधवांचे दोन दिवशी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. हे शिबिर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ परळीतील असंख्य पत्रकारांनी घेतला व आपल्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी केली.

 अ.भा.मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी शहर व तालुका पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालय परळी यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या दिवशी पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरात ईसीजी, सोनोग्राफी, नेत्र तपासणी, दंतरोग, शुगर, बीपी, आदिसह विविध आजाराच्या अनुषंगाने रक्त तपासण्या करण्यात आल्या. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य तपासणी शिबिर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडले. उपजिल्हा रुग्णालयातील दहा डॉक्टर्स व परिचारिका आदींनी या कामात अमूल्य असे सहकार्य केले. यात परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय ढवळे, डॉ.अरुण गुट्टे, डॉ. दिनेश कुरमे, डॉ.अमोल देवळे, डॉ. किशोर घुबडे, डॉ. बालाजी फड, डॉ. पूजा राजमाने, डॉ. सविता मुंडे, डॉ. प्रियंका डोळे,दंत रोग तज्ञ डॉ.रोहित झरकर,एच आय व्ही विभागातील डॉ. वसीम शेख, डॉ. शरद चव्हाण, आदिसह रणजीत मस्के, विजयमाला टाक, अर्चना घुन्ड्रे, बिएमआय मिलिंद सोनकांबळे (बीएमआय),इन्चार्ज टाकळकर सिस्टर, मेट्रन गायकवाड मॅडम, जगतकर सिस्टर, दिपाली देवघाट, गंगाधर खंडे, फरजाना शेख, सुधामती खंड्रे, आहार तज्ञ ए.एस.भद्रे यांनी आपली आरोग्य सेवा शिबिरासाठी दिली. या शिबिरात ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मण वाकडे,संपादक प्रशांत जोशी, संपादक बालासाहेब कडबाने, संपादक राजेश साबणे, संपादक बालासाहेब फड, संपादक बालकिशन सोनी, दैनिक लोकमत टाईम्सचे प्रतिनिधी राजू कोकलगावे, संपादक अनंत कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, इंजि. भगवान साकसमुद्रे, बाबा शेख, प्रा.दशरथ रोडे, अमोल सूर्यवंशी, आदि संपादक व पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवला.

     शिबिराच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय अरबुने, शिबिराचे प्रोजेक्ट चेअरमन जगदीश शिंदे, धीरज जंगले, माणिक कोकाटे, अभिमन्यू फड, आदिसह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा परळीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार