सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कु.किरण कुट्टे हिची बीड जिल्हा संघात निवड*

मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी

Abhimanyu
  • Nov 29 2022 9:30PM
परळी / प्रतिनिधी

महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील इयत्ता 9 वर्गात शिक्षण घेत असलेल्या कु.किरण कुट्टे या विद्यार्थिणीची
बीड जिल्हा असोसिएशनच्या कुमारी संघात निवड झाली असून राज्य पातळीवरील स्पर्धेत ती बीड जिल्ह्यासाठी खेळणार आहे.

महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या संचालक मंडळाच्या  मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विद्यालय मोहा ही शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेला क्रीडा आणि कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपल्या दमदार खेळीने सर्वांचे लक्ष्य वेधून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता कु.किरण कुट्टे हिची निवड करण्यात आली असून ती राज्य पातळीवरील बीड जिल्ह्याच्या मुलींच्या कबड्डी संघात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.कु.किरण च्या या यशामागे तिचे प्रशिक्षक क्रीडा शिक्षक सुनील तारे,शाळेचे क्रीडा प्रेमी मुख्याध्यापक धंनजय देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कु.किरण च्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सर्व संचालक , शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार