सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रभू वैद्यनाथाच्या कॅरीडोरसाठी सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येत पुढाकार घ्यावा- सुरेश चव्हाणके

दिवगंत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत केले अभिवादन

Abhimanyu
  • Nov 27 2022 7:09PM
परळी (प्रतिनिधी):- प्राचीन काळापासुन आपले जे तीर्थक्षेत्र आहेत. त्या ठिकाणी भव्य मोठमोठे भव्य मंदिर बनवले. एवढ्या जनसंख्येच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा, कॅरीडोर बनावे अशी मागणी आम्ही वर्षानुवर्ष करत होतो. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रधानमंत्री लाभले. त्यांनी मोठमोठे तीर्थस्थान विकसित केले. काशीमध्ये 300 कोटीचा कॅरीडोर झाला. 768 कोटीचा उज्जैन मध्ये कॅरिडोर झाला तसाच कॅरिडॉर परळी वैद्यनाथ येथेही व्हावा असा संकल्प साक्षात महादेवाला केला असून या ठिकाणच्या सर्व राजकीय नेत्यांनी प्रभु वैद्यनाथाच्या कॅरीडोरसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत,असे आवाहन सुदर्शन न्युज चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. ते प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे आले होते.


 संपादक सुरेश चव्हाणके, हिंदू भूषण श्यामजी महाराज यांचा सत्कार वैद्यनाथ देऊळ कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी केला. यावेळी डॉ. अजित केंद्रे, डॉ. बाळासाहेब कराड, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी, उद्योजक मेनकुदळे, शंकर मुंडे, सचिन घुले, ओंकार मिरकले, ऋषिकेश नागापुरे, लल्ला गीते, दीपक जोशी, वर्षाताई जोशी, शिवाजी फड, अनंतराव हंगे, विष्णुपंत मुंडे, नरेश मुंडे, अनिल मुंडे, सुनील मुंडे, अभिजीत मुंडे अनिरुद्ध जोशी, अतुल दुबे, गजानन कोकीळ, वैजनाथ कळसकर, आनंद कुलकर्णी, स्वानंद पाटील, सुरेश फड, कृष्णा मुंडे, शिवशंकर मुंडे,आकाश चोपणे, गजू चालोडे, गोविंद मुंडे अमोल सूर्यवंशी,प्रशांत कमाले,हनुमान सातपुते, जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, ओम प्रकाश बुरांडे, धनंजय आरबुने, धीरज जंगले, जगदीश शिंदे, बालकिशन सोनी, संभाजी मुंडे, संजीव रॉय, अभिमन्यू फड आदिची उपस्थिती होती.

       यावेळी पुढे बोलताना सुरेश चव्हाण हे म्हणाले की, या ठिकाणच्या सगळ्या राजनीतिक नेत्यांनी प्रभू वैद्यनाथ कॅरीडोर साठी पुढाकार घ्यावा.परळी वैजनाथ येथील प्रोफेशनल आर्किटेक तसे महादेवाला मानणारे सर्वच आर्किटेक यांनी आपल्या आपल्या कन्सेप्ट एकत्र कराव्यातएक समिती व्हावी त्या समितीला संपूर्ण सहयोग करून केंद्र सरकारचा फॉलो अप  आणि प्रधानमंत्री यांच्यापर्यंत हा मुद्दा पूर्णपणे व्यवस्थित जावा. यासाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी या कॅरिडोरची कल्पना पूर्ण होऊन याच भूमिपूजन व्हावं. हा सोहळा आपल्या डोळ्यांनीच आपल्याला पाहायला भेटावा अशी कल्पना असा संकल्प मी आज प्रभुवैद्यनाथाच्या चरणी केला असल्याचेही ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार