सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी पारधी वस्ती वरील लहान मुलांसोबत साजरा केला बाल दिवस

लहान मुलांनी दिले वस्तीवर येण्याचे निमंत्रण

Abhimanyu
  • Nov 15 2022 9:14AM

अंबाजोगाई :-  देशभरात 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी बालदिन अंबाजोगाई येथील शिकलकरी आणि पारधी वस्तीवरील लहान मुलांसोबत बालदिन साजरा केला. यावेळी नेरकर यांनी पारधी आणि शिकलकरी वस्तीवरील मुलांना ग्रामीण पोलीस ठाण्यात आमंत्रित करून त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. अगदी पोलीस ठाण्यात तक्रारदार आल्यापासून एफआयआर कसा घेतात, तपास कसा करतात, तुरुंग तसेच विविध हत्यारे दाखवून इत्यंभूत माहिती दिली. त्यासोबतच खाऊ आणि गोड पदार्थांचे वाटप करून त्यांच्यासाठी विविध खेळही आयोजित करण्यात आले. पोलिसांकडून मिळालेला आपुलकीच्या वागणुकीमुळे मुलांमध्ये अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यावेळी मुलांनीही आपल्याला येणारी गीत सादर केली. अंगीभूत असणारे कलागुण त्यांनी सर्वांना दाखवले. आपल्या हाताने बनवलेल्या भेट वस्तू त्यांनी नेरकर आणि त्यांच्या टीमला दिल्या. मुलांच्या देशभक्तीपर घोषणांनी ग्रामीण पोलीस ठाणे निनादून गेले होते. यावेळी प्रख्यात समाजसेवक प्रसाद चिक्षे यांच्यासह पोलीस निरिक्षक उदार, पीएसआय केंद्रे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*कविता नेरकर यांना लहान मुलांनी दिले वस्तीवर येण्याचे निमंत्रण*

पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे भारावून गेलेल्या लहान मुलांनी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना आपल्या वस्तीवर येण्याचे निमंत्रण दिले त्यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारत नेरकर यांनी मी लवकरच तुमच्या वस्तीवरील असा शब्द या बालगोपाळांना दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार