सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्यावतीने दुर्गोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते होणार उद्घाटन-फुलचंद कराड*

Abhimanyu
  • Sep 22 2022 6:02PM

परळी,( प्रतिनिधी):- कोरोना संसर्गाच्या कालावधीत थांबलेली दुर्गा उत्सवाची परंपरा आपण आता पुन्हा सुरू करीत असून श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान परळीच्या वतीने नवरात्र उत्सवात भक्ती, करमणूक, असे नऊ रंग भरले जातील अशी माहिती दुर्गोत्सवाचे अध्यक्ष तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिली. प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते दुर्गोसवाचे उद्घाटन होत असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी देवीची सायंकाळी 4 वाजता घटस्थापना होणार असल्याचे फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान परळी च्या वतीने नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्ती, समाजप्रबोधन, करमणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फुलचंद कराड यांनी दिली. या अंतर्गत दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता फुलचंद कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनबाई कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना होईल. दि 27 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते दुर्गोसवाचे उद्घाटन होत असून याच दिवशी अर्चना सावंत कोल्हापूर यांचा "अप्सरा आली"हा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 28 रोजी ज्योती साटम मुंबई प्रस्तुत "जागर कुलस्वामिनीचा"
हा देवीच्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. दि. 29 सप्टेंबर रोजी दर्शन साटम मुंबई प्रस्तुत "लावण्य तारका " हा लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 30 रोजी प्रसिद्ध गायक शुभम मस्के पुणे यांचा भीम गीते हा दर्जेदार व अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होणार आहे. 1ऑक्टोबर रोजी शशी बासुतकर प्रस्तुत म्युझिक " मेलडी आर्केस्ट्रा " होणार आहे. जुन्या नव्या गाण्याची ही मैफिल असून अनेक मान्यवर गायक यात सहभागी होणार आहेत. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य हभप रामरावजी महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे . दिनांक 3 ऑक्टोबर रोजी समीर ताज आणि परविन अजमेरी या कव्वाल गायकांचा कव्वाली मुकाबला होणार आहे समीर ताज हैदराबाद येथून परविन अजमेरी यांच्यासोबत विशेष कव्वालीचा संच घेऊन परळीत प्रथमच येत आहेत. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी चैत्राली राजे पुणे यांचा  लावणीचा  "नाद करायचा नाय "हा कार्यक्रम होणार आहे. दुर्गोसवाचा समारोप विजयादशमीला म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी होत असून दुष्ट प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन सायंकाळी 7  तोतला मैदानावर होणार असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.
     भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. मोंढा मैदानावर दुर्गोसवाची तयारी अंतिम स्वरूपात आली असून सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी सात वाजता होणार आहेत. दुर्गोत्सवाचे हे 13 वे वर्ष आहे. मध्यंतरी कोरोना संसर्ग असल्याने 2 वर्ष फक्त देवीची स्थापना करण्यात आली होती. आता सर्व निर्बंध दूर झाल्याने नवरात्रीच्या उत्सवात करमणुकीच्या कार्यक्रमातून नवरंग भरण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सर्व कार्यक्रमाचा परळी शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फुलचंद कराड यांनी केले आहे.

@@@@@@

*देवीची कृपा*
कोरोना सरला त्या पाठोपाठ चांगला पाऊस झाला आहे. अद्याप पावसाची गरज असली तरी देवीच्या कृपेमुळे परिसरात पिके जोमात आली आहेत. ही सर्व काही देवीची कृपा असून मी उत्सव घेत असलो तरी त्या पाठीमागे देवीची आदिशक्ती आहे. मी केवळ निमित्त असून हा उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होत असल्याने मला निश्चितच आनंद वाटतो. भविष्यात शेती व विविध क्षेत्रावरील संकटे दूर व्हावीत हीच प्रार्थना मी या निमित्ताने करीत आहे.
-फुलचंद कराड
मुख्य संयोजक दुर्गोत्सव 2022
तथा अध्यक्ष संत श्री भगवान बाबा प्रतिष्ठान

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार