सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परळी शहरात अंगणवाडीत पोषण माह निमित्त विविध जनजागृती पर कार्यक्रम संपन्न

एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाच्या वतीने प्रतिवर्षी पोषण महासप्ताह अंतर्गत विविध जनजागृती पर कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही स्तनदा माता,किशोरवयीन मुली आदींसाठी पोषण सप्ताहाच्या ऐवजी पोषण माह(महिना) चे आयोजन करण्यात आले आहे.हा पोषण माह 1 सप्टेबर ते 30 या दरम्यान चालणार

Abhimanyu
  • Sep 18 2022 8:39PM
परळी : शहरातील सावतामाळी नगर भागात असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६० मधे एकात्मिक बाल विकास योजना नागरी प्रकल्प अंबाजोगाई परळी वैजनाथ यांच्या निर्देशानुसार पोषण(माह)महिना अंतर्गत किशोरवयीन मुली तसेच स्तनदा माता यांच्या परिपूर्ण पोषणासाठी उपयुक्त तथा सकस आहारासंबंधी माहिती देणारा जनजागृती पर कार्यक्रम दिनांक 16 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की,एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाच्या वतीने प्रतिवर्षी पोषण महासप्ताह अंतर्गत विविध जनजागृती पर कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही स्तनदा माता,किशोरवयीन मुली आदींसाठी पोषण सप्ताहाच्या ऐवजी पोषण माह(महिना) चे आयोजन करण्यात आले आहे.हा पोषण माह 1 सप्टेबर ते 30 या दरम्यान चालणार असून यामध्ये कुपोषणाच्या समूळ उच्चाचटनासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना  नागरी प्रकल्प अंबाजोगाई तसेच परळीच्या सुपरवाइझर  नीता मानकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील जवळपास ६४ अंगणवाड्या मधे पोषण आहारविषयक जनजागृती पर  कार्यक्रम घेण्यात येणार आहेत याचं पोषण माह अंतर्गत दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील सावतामाळी नगर येथील अंगणवाडी क्रमांक ६० मधे स्तनदा माता , किशोरवयीन मुली आदींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करत सकस आहारविषयक माहिती देण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका शुभांगी देशमुख, अरुणा बनसोडे,  प्रेरणा फड, अश्विनी फड,स्वाती वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार