सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बजरंग सोनवणेंचा प्रचार करायचा नाही म्हणत सुदामती गुट्टे यांना जीवे मारण्याची धमकी

याप्रकरणी गोट्या उर्फ ग्यानबा मारोती गित्ते रा. नंदागौळ याच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shruti Patil
  • Apr 22 2024 6:22PM
परळी: सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या तुतारी चिन्हाचा प्रचार करायचा नाही असे म्हणत पिस्तुलाने खुन करण्याची धमकी दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) च्या नेत्या सुदामती गुट्टे यांच्या फिर्यादीवरुन नंदागौळ येथील गोट्या उर्फ ग्यानबा मारोती गित्ते याच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत सुदामती गुट्टे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.20 एप्रिल रोजी रात्री महाविकास आघाडीची बैठक अटोपुन रात्री 8 वाजता जय नगर येथील निवासस्थानी आले असता गोट्या उर्फ ग्यानबा मारोती गित्ते याने फोन करत बबन गित्ते आमचा दुश्मन आहे,त्याला आम्ही जीवे मारणार आहोत.तुम्ही बजरंग सोनवणे यांच्या तुतारीचा प्रचार नाही अन्यथा तुमचा पिस्तुलाने खुन करु. गोट्या उर्फ ग्यानबा याच्यावर परळी, पुणे येथे विनापरवाना पिस्तुल बाळगल्याचे 15 गुन्हे दाखल आहेत.तो सराईत गुन्हेगारासोबत फिरतो.त्याला राजकिय गटातुन पाठिंबा मिळत असल्याने त्यास हद्दपार करावे असे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गोट्या उर्फ ग्यानबा मारोती गित्ते रा. नंदागौळ याच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार