सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बंदूक घेऊन दोन व्यक्ती घुसल्याच्या अफवेने दहशतीचं वातावरण

बंदूक घेऊन दोन व्यक्ती घुसल्याच्या अफवेने दहशतीचं वातावरण

Sudarshan MH
  • Jun 27 2021 8:02AM
 
मुंबईतील मंत्रालयात काही दिवसांपूर्वी बॉम्ब ठेवल्याच्या अफवा उडाली होती. त्यानंतर आता कुलाब्यातील ताज हॉटेलमध्ये दोन मास्कधारी व्यक्ती बंदुकीसह घुसले असल्याच्या फोनने दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि घटनास्थळाची पाहणी करण्यास पोहोचल्या आहे. मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून घटनास्थळाची पाहाणी केली गेली. त्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलं आहे.
 
मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवत हा फोन कुठून आला, याचा शोध लावला. त्यानंतर एका १४ वर्षीय मुलांने हा फोन केल्याचं समोर आलं आहे. चौकशीअंती हा फोन कॉल खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेबाबत त्याच्या वडिलांना काहीच माहित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 
अफवा जरी असली तरी फोननंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली गेली. तसेच ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार