सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तौत्के चक्रीवादळामुळे बुडालेल्या मच्छिमारी नौका ना नुकसान

पालघर - पालघर तौत्के चक्रीवादळामुळे पालघर तालुक्यातील माहीम टेंभी व उसरणी गावातील मच्छीमारी करणाऱ्या बोटी बुडाल्या किंवा मोठे नुकसान झाले,

Sudarshan MH
  • May 19 2021 4:23PM


   पालघर - पालघर तौत्के चक्रीवादळामुळे पालघर तालुक्यातील माहीम टेंभी व उसरणी गावातील मच्छीमारी करणाऱ्या बोटी बुडाल्या किंवा मोठे नुकसान झाले, अशा बोटीच्या मालकांना भेटण्यासाठी खासदार  राजेंद्र गावित  माहीम टेंभी व उसरणी, केळवे वडराई ,ह्या गावांना भेटी दिल्या त्यांच्यासोबत मत्स्यव्यवसाय खात्याचे सहाय्यक आयुक्त श्री पालवे साहेब होते .
माहीम टेंभी येथील मुकेश तांडेल, नीलेश तांडेल व शांताबाई तांडेल यांच्या पाच ते सहा लाख रुपये किमतीच्या बोटी चक्रीवादळामुळे समुद्रात वाहून गेल्या आहेत .
 तसेच उसरणी येथील रमेश वैद्य व किशोर तरे यांच्या बोटी  चक्रीवादळामुळे समुद्रातच फुटल्या व परत वापरता न येण्यासारख्या झाल्या अशा मच्छिमारांना  खासदार  राजेंद्र गावित व त्यांच्यासोबत असलेले शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे यांनी धीर दिला तसेच प्रधानमंत्री मस्य संपदा योजनेअंतर्गत चाळीस टक्के सबसिडी देऊन नवीन बोटी  निर्माण कराव्यात असेही सांगितले.
 सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय  पालवे  यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मधून सबसिडी मिळवून देण्यासाठी  मच्छिमारांना मदत करावी अशा सूचना दिल्या .
तसेच शासनाकडून बोट मालकांना भरीव मदत देण्यासाठी मी प्रयत्न करीन असेही खासदार राजेंद्र गावित मच्छीमारांना म्हणाले .
बहुतेक मच्छीमार गावांमध्ये तौत्के  चक्रीवादळामुळे घरांचे खूप नुकसान झाले आहे, त्याचा पंचनामा लवकरात लवकर करावा अशा सूचना स्थानिक महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना खासदार  गावित यांनी दिल्या .
बऱ्याच शेतकऱ्यांचे तौत्के  चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे केळी नारळी आंबे व इतर पिकांचे विशेष  फळबागांचे नुकसान झाले आहे  कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून शासनाकडून जास्तीत  जास्त हेक्‍टरी नुकसान भरपाई देण्यासाठी  खासदार राजेंद्र गावित  प्रयत्न व पाठपुरावा करणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार