सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शाळा ऑनलाईन तरी शुल्क मात्र पूर्ण वसुल पालक वर्ग हैरान

पालघर - पालघर जिल्ह्यातील काही खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन व मेसेज करून शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत सक्ती केली जात आहे

Sudarshan MH
  • Jun 30 2021 12:04PM


पालघर - पालघर जिल्ह्यातील काही खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन व मेसेज करून शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत सक्ती केली जात आहे, अश्या खाजगी शाळांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पालघर जिल्ह्यातील पालकांकडून केली जात आहे. वास्तविक पाहता शिक्षण मंत्र्यांनी लॉकडाऊन उठे पर्यंत कोणत्याही शाळांनी शैक्षणिक शुल्क आकारू नये असे आदेश काढले असतांना पालघर जिल्यातील खाजगी शाळा सदर आदेश धुडकावीत असल्याचे निदर्शनास येत असून सदर शाळांनी ठराविक मुदत दिली असून मुदतीत शुल्क न भरल्यास पाल्याचा प्रवेश रद्द करण्याचा थेट इशारा दिला आहे. शाळांच्या दडपशाही निर्णयामुळे पालकांमध्ये घबराहट निर्माण झाले असून अशा वाईट परिस्थिती मध्ये पालक फी भरणे साठी कसरत करत आहेत. व शाळांचा मनमानी निर्णयामुळे पाल्याचे प्रवेश रद्द होऊ नये या करीता तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
दुसऱ्यांदा कोरोनामुळे लागलेला मिनी लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीपायी पालकांवर स्कूल फी वाढीचा अतिरिक्त ताण येऊ नये, म्हणून साल 2019-20 -21 या शैक्षणिक वर्षातील थकीत फी एकरकमी फिस वसुली सुरू आहे.फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात त्रास देणं, त्यांना लिंक न देणं असे प्रकार सद्या खाजगी शाळानी पालघर जिल्यात सुरू केले आहेत. कोरोनाकाळात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा कमी फी घेण्याची भूमिका पालघर जिल्हा पालकानी वारंवार शाळा व्यवस्थापनाकडे मांडली आहे.  
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. सरकारी असो वा खासगी शाळांनी मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू ठेवले आहेत.ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांच्या खर्चात बरीच बचत झाली. मात्र, यानंतरही काही खासगी शाळांकडून पूर्ण फी वसूल केली जात आहे. 
शाळा संचालकांनासुध्दा कोरोनाचा फटका बसला, त्यांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल न करता त्यात काही प्रमाणात सूट द्यावी, असा पालकांचा सूर आहे, तर खासगी शाळा संचालकांनुसार मागील दीड वर्षांपासून शाळा ऑनलाईन असल्या तरी शिक्षकांचे पगार, भाडे, वीजबिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करावेच लागत आहे. त्यामुळे हा सर्व खर्च करावा लागत असून, अनेक पालकांनी मागील दीड वर्षांपासून फी भरली नाही. त्यामुळे शाळा संचालक अडचणीत आले असून, त्यांना सुध्दा कर्ज काढून गरज भागवावी लागत असल्याचे सांगितले. 
कोट - मागील वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरूच आहे. यासाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे लागत आहे. तर इतर खर्चसुद्धा सुरूच आहेत. त्यामुळे शाळा ऑफलाईन असल्या तरी खर्च मात्र सुरूच आहे. बऱ्याच शाळांनी पालकांना फी भरण्यासाठी सवलत दिली आहे. पालकांनीसुद्धा संस्थाचालकांची अडचण लक्षात घ्यावी. - 
कोट -शाळा व्यवस्थापका कडून पूर्ण फि भरा तरच मुलाचे ऑनलाइन शिक्षण बंद करू असा दम भरत आहेत कोरोणा काळात आमची आर्थिक परिस्थिति बिगडली असून यावेळी शाळा व्यवस्थापका कडून आम्हाला फि भरण्यासाठी काही महिन्याची मुदत वाढ द्यावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार