सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पकडून दिलेले गोवंश तस्करासह सोडून देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यालाबद्दल ऊसळला संताप* *अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला हटवा; पोलीस अधीक्षकांना गोरक्षकांचे साकडे*

अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला हटवा; पोलीस अधीक्षकांना गोरक्षकांचे साकडे

Nandurbar MH
  • Nov 18 2020 9:16PM
  सुदर्शन न्युज नंदुरबार (केतन रघुवंशी)
नंदुरबार-गोरक्षकांनी कत्तलीसाठी जाणारे 13 गोवंश पकडून दिलेले असतानाही सहाय्यक पोलीस निरीक्षक लोले यांनी संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी आरोपी सोडून देत ते गोवंश मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा निर्दयीपणा केल्याचे उघडकीस आले. गोवंश वाचवण्या ऐवजी कत्तलीसाठी जाऊ देणारे असे उलट्या काळजाचे निर्दयी अधिकारी असल्यावर गाईंना संपवणाऱ्या कसायांना दोष देण्यात अर्थ काय? असा संतप्त प्रश्न गोरक्षकांनी उपस्थित केला आहे.
गोवंश तस्करी आणि गोमांस विक्रीचे माहेरघर बनलेल्या नंदुरबार लगतच्या दोंडाईचा शहरात हा संतापजनक प्रकार घडला. याविषयी धुळे येथील गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काल मंगळवार दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास खबरी कडून मिळालेल्या माहितीनुसार M H 04 -1861 वाहनात13 गोवंश कत्तली साठी वाहून नेले जात असल्याचे दोंडाईचा येथील गो रक्षकांना माहीत झाले. म्हणून त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. वरील क्रमांकाच्या वाहनात अत्यंत निर्दयपणे बांधलेले 13 गोवंश आढळून आले. दोंडाईचा पोलीस ठाण्यात खबर देऊन तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्या ठिकाणी खात्री करून वाहनासह गोवन पोलीस ठाण्यात नेले. आता लगेच संबंधित गोवंश तस्करांवर कारवाई केली जाईल व गुन्हा दाखल होईल असे गो रक्षकांना वाटले. परंतु तसे न होता अचानक थोडया वेळाने दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोले यांचे विचार बदलले. त्यांनी गो रक्षकांची तक्रार घेण्यास सरळ नकार दिला व फोन घेण्यासही नकार दिला. पोलीस स्वतः फिर्यादी होतील; असे त्यांनी स्थानीय गोरक्षकाना सांगून चक्क दिशाभूल केली आणि सर्वांना घरी पाठवले. तथापि सकाळी ५ वाजता पोलसानी सदर वाहन सोडून दिल्याचे गोरक्षकांना लक्षात आले. वास्तविक गुन्हा दाखल करणे थांबवण्याचा प्रकार करु नका अन्यथा वरिष्ठांना तक्रार देऊन आम्ही गुन्हा दाखल करू अशी जाणीव आधिच गोरक्षकांनी दिली होती. पोलीस नियंत्रण कक्षात 2:26 वाजता 02562288211 तसा फोनही केला होता. याची दखल घेत नियंत्रण कक्षातून सहाय्यक पोलीस निरीक्षक लोले यांना सांगितले सुद्धा गेले. मात्र भ्रष्ट आणि निर्दय असलेल्या लोले नावाच्या या अधिकाऱ्याने पोलीस खात्यास काळिमा फासला. यात नक्कीच अर्थपूर्ण व्यवहार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. गायींची कत्तल करणाऱ्या कसायांवर कृपादृष्टी दाखवणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याबद्दल प्रचंड संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. लोले यांना कडक शासन केले जावे, अशी मागणी जोर धरू लागली असून धुळे येथील गोरक्षक संजय शर्मा यांनी सांगितले की अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला हटवणे गरजेचे आहे. यासंदर्भात
उद्या गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सदर अधिकाऱ्याविरुद्ध फिर्याद देण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे जाणार आहोत, अशीही माहिती संजय शर्मा यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार