सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आजी पंतप्रधानांनी मोडला माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड.

गैरकॉंग्रेसी पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त काळ सत्तेत राहण्याचा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला.

Snehal Joshi .
  • Aug 14 2020 8:20PM
गैरकॉंग्रेसी पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त काळ सत्तेत राहण्याचा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला.यासोबतच लालकिल्ल्यावरुन सर्वाधिक म्हणजे सातव्यांदा राष्ट्रध्वज फडकवणारे मोदी पहिलेच गैरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. आपल्या तीन कार्यकाळात अटलबिहारी वाजपेयी यांनी 2268 दिवस देशाचे पंतप्रधानपद भूषवले. आज गुरुवारी मोदी यांच्या पंतप्रधानपदाचे 2268 दिवस पूर्ण झाले. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली.2019 च्या निवडणुकीतही मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला पहिल्यापेक्षाही जास्त बहुमत मिळाले. 30 मे 2019 ला मोदी यांनी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.  यासोबतच सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे मोदी चौथे आहेत. सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरु यांचा आहे. नेहरु 16 वर्ष 286 दिवस म्हणजे 6130 दिवस पंतप्रधान होते, त्या खालोखाल त्यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी 15 वर्ष350 दिवस म्हणजे 5829 दिवस पंतप्रधान होत्या. डॉ. मनमोहनिंसग 10 वर्ष 4 दिवस म्हणजे 3656 दिवस देशाचे पंतप्रधानपद होते. वाजपेयी तीनदा पंतप्रधान होते, पण पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांना एकदाही पूर्ण करता आला नाही. वाजपेयी पहिल्यांदा 13 दिवस, नंतर 13 महिने पंतप्रधान होते. तिसर्‍या कार्यकाळात लोकसभा निवडणूक आधी घेण्यात आल्यामुळे वाजपेयी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही.  वाजपेयी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरुन सहावेळा राष्ट्रध्वज फडकवला. वाजपेयी यांचा हा विक्रमही मोदी मोडण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान म्हणून मोदी यावेळी सातव्यांदा लालकिल्ल्यावरुन तिरंगा फडकवणार आहे.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार