सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*पंतप्रधान भारत-चीनचा बॉर्डर वर पोहोचले मुख्यमंत्री कधी जाणार कोकणात

भारत- चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली.पंतप्रधानांच्या या भेटीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Snehal Joshi
  • Jul 4 2020 12:01AM
भारत- चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली.पंतप्रधानांच्या या भेटीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.भारत- चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण असून,आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचे मनोबलही वाढवले.पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह युध्दभूमीवर पोहचले,पण महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोकणात देखील नाही जाऊ शकले,असे दरेकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.राज्यात निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टीला मोठा तडाखा बसला होता.त्यामुळे कोकणासह राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबागचा दौरा केला होता.त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना मदत वाटपाचा दौरा रद्द करावा लागला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार