अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्या; मुंबई हायकोर्टात याचिका
कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील दत्ता माने यांनी ही याचिका केली असून यावेळी त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.
जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो असा दावा दत्ता माने यांनी याचिकेत केला आहे. “जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखं आहे,” असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. अदर पूनावाला तसंच सीरमच्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प