सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक संदर्भात २५ नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

२५ नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sudarshan MH
  • Nov 24 2020 10:48AM
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे पिंपरीचिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम दादा देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 


भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार व शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार