सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

“सीमाप्रश्नी सरकार सर्वोपरी प्रयत्नशील”, महाराष्ट्रदिनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जनतेसाठी संदेश!

महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राला उद्देशून विशेष संदेश दिला.

Sudarshan MH
  • May 1 2021 3:27PM


महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राला उद्देशून विशेष संदेश दिला. तसेच, सध्याच्या संकट काळामध्ये राज्यातील जनतेनं करोनासंदर्भातले नियम पाळून सुरक्षित व्हावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोना काळात राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना आणि करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्य विविध उपाययोजना यांच्याविषयी देखील माहिती दिली. “कोविड-१९च्या संकटावर मात करताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित, उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देताना राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी माझे शासन काम करत आहे”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.

सीमाप्रश्नावर सरकार प्रयत्नशील
दरम्यान, यावेळी बोलताना कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना त्यांनी सरकारचं कौतुक देखील केलं आहे. “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी माझ्या शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे”, असं ते म्हणाले.

कोविड नियमांचं पालन करा
राज्यातील नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील राज्यपालांनी केलं आहे. “राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं सर्वांनी पालन करावं. मास्क-सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत आणि सुरक्षित व्हावे. कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांनीच पुढे यावे” असं ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार