सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणाऱ्या रिक्षावर विसरवाडी पोलीसांची छापा कारवाई 89,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

दि. 28.09.2021 रोजी बिजगांव गावातुन गावठी हातभट्टीची दारु एका पांढऱ्या रिक्षामध्ये नंदुरबार करीता वाहतुक होणार आहे.

Nandurbar MH
  • Sep 28 2021 6:39PM


दि. 28.09.2021 रोजी बिजगांव गावातुन गावठी हातभट्टीची दारु एका पांढऱ्या रिक्षामध्ये नंदुरबार करीता वाहतुक होणार आहे. अशी विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने सपोनि नितीन पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/भुषण बैसाणे, पोकॉ/509 लिनेश पाडवी, पोकॉ/670 भोजराज धनगर, चापोना/ 349 राजु कोकणी, पोकॉ/215 पिंटु पावारा अशांनी बिजगांव गावाजवळ दबा धरुन बसले असता एक पांढऱ्या रंगाची ॲपे रिक्षा क्र. GJ 01 BU 4072 अशी बिजगांव रोडाने नंदुरबार कडे जातांना दिसली. सदरची रिक्षा संशय आल्याने तिचेवर अचानक 10-20 वाजता छापा टाकुन थांबविली असता रिक्षाचे सिटच्या खाली, मागच्या बाजुला काळ्या रबरी ट्युब मध्ये भरलेली गावठी हातभट्टीची दारु विनापरवाना, विनापास चोरटी वाहतुक करताना 1) राहुल चुनिलाल गावित, वय 31 वर्षे (रिक्षा चालक), 2) यशवंत बिलाड्या गावित, वय 45 वर्षे, दोन्ही राहणार बिजगांव, पोस्ट- मोग्राणी, ता. नवापुर, जि. नंदुरबार अशांना ताब्यात घेतले. सदर रिक्षात एकुण 30 लिटर प्रत्येकी असे 16 रबरी ट्युब व 15 लिटीर दारु असलेला एक ट्युब मिळाले असुन एकुन 495 लिटर गाहभ दारु रिक्षासह एकुण 89,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त कलेला आहे.

सदर आरोपीतां विरुध्द पोकॉ/509 लिनेश पाडवी यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई), 65 (क), 83 प्रमाणे विसरवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील सो.. अपर पोलीस अधिक्षक विजय पवार साो. उपविभागीय " पोलीस अधिकारी सचिन हिरे सो. याचे सुचना व मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे..

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार