सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

16 लाख 32 हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक कारवाई

दिनांक 09/10/2021 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना बातमी मिळाली

Nandurbar MH
  • Oct 11 2021 11:42AM


मा. पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक 09/10/2021 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना बातमी मिळाली की, मध्य प्रदेश राज्यातील खेतिया गावाकडुन म्हसावद धडगांव गावाकडे एक मालवाहु पिक वाहनाने अवैध विदेशी दारुची चोरटी वाहतुक होणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांना सदर माहिती कळवून योग्य ते मार्गदर्शन करून तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार व त्यांचे अमंलदार हे शहादा-म्हसावद धडगांव रोडवरील दरा गावाचे पुढे दबा धरून बसले असता 20.45 वा. सुमारास म्हसावद गावाकडुन एक चारचाकी पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले, म्हणून पथकातील अमंलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहायाने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेलो. म्हणुन पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग केला असता दरा गावाच्या पुढे काही अंतरावर वाहन चालकाने वाहन थांबवून तेथुन पळ काढला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे खोके दिसून आल्याने खोके उघडुन पाहिले असता त्यात 9 लाख किमतीच्या मॅकडॉल्व नंबर-1 रिझर्व व्हिस्कीच्या 180 एम.एल. चे एकुण 80 बॉक्स व त्यामध्ये 3840 सिलबंद हजार 400 रुपये काचेच्या वाटल्या, 3 लाख 30 हजार 400 रुपये किमतीच्या मॅकडॉल्व नंबर रिझर्व व्हिस्कीच्या 750 एम.एल. चे एकूण 20 वॉक्स व त्यामध्ये 240 सिलबंद काचेच्या बाटल्या तसेच एक लोखंडी पितळी मुठ असलेली धारदार तलवार व 5 लाख रुपये किमंतीचे एक महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन क्रमांक MH-04 FJ-6867 असा एकूण 16 लाख 36 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन फरार झालेल्या वाहन चालकाविरुध्द म्हसावद पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच फरार झालेल्या आरोपीताला बेड्या ठोकण्यात येतील असे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले,सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बहादुर भिलाला, पोलीस नाईक शैलेंद्रसिंग राजपुत, मोहन साळवे, प्रकाश सोनार, उमेश पावरा, सचिन तावडे यांचे पथकाने केली असुन मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर.पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार