सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत अद्याप अनिश्चितता दुर्दैवी- प्रभाकर शिंदे

दि. ०२.०६.२०२१ लस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या जागतिक निविदेची सद्यस्थिती काय ?,

Sudarshan MH
  • Jun 2 2021 6:28PM


दि. ०२.०६.२०२१
लस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या जागतिक निविदेची सद्यस्थिती काय ?, किती दिवसात लस पुरवठा होणार ?, किती संख्येने लस पुरवली जाईल ? लसीचा  दर व रक्कम काय असेल असे प्रश्न विचारत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत माहितीचा मुद्दा  (Point Of Information) उपस्थित केला.

मुंबईकरांचे तातडीने लसीकरण झाल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट वेळीच रोखता येईल. यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. आज रोजी लस उपलब्ध नसल्याने शहरातील ८० टक्के लसीकरण केंद्र बंद आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून अनेकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता माघारी जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयस्कर नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून मुंबईतील लसीकरण मोहिमेचे नियोजन बिघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत समस्त मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत गटनेते शिंदे यांनी व्यक्त केले.

या मुद्द्यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त श्री. वेलारासू यांनी माहिती दिली की, ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. १० निविदाकारांपैकी एकही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे. परंतु अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही त्यामुळे लसीचा पुरवठा नेमका कसा होणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे अशी माहिती श्री. वेलारासू यांनी दिली. 

ही वस्तुस्थिती लक्षात घेता अद्याप ग्लोबल टेंडरद्वारे लस उपलब्धतेबाबत अनिश्‍चितता कायम आहे ही बाब गंभीर असून लसीकरणापासून वंचित मुंबईकरांच्या दृष्टीने दुर्दैवीही आहे असे प्रतिपादन भालचंद्र शिरसाट यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार