सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मागासवर्गीय यांची सरळसेवा भरती प्रक्रिया स्थगिती उठवावी : विधानसभा अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले

महाराष्ट्र राज्यभरातील विविध ओबीसी संघटनांची गोलमेज परीषद 10 नोव्हेंबरला मुंबई येथे होणार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे यावेळी सांगण्यात आले आहे. या गोलमेज परीषदेत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे.

Snehal Joshi .
  • Oct 15 2020 8:12PM
आज दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी विधानसभा अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या दालनात ओबीसींच्या विविध पुर्वापार मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मागासवर्गीय उमेदवाराची सरळ सेवा नौकर भरती आणि पदोन्नतीच्या आरक्षणा बाबत सविस्तर चर्चा झाली, त्यात अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी आदेश दिले की ज्या कारणामुळे मागासवर्गीय यांची सरळसेवा भरती प्रक्रिया 22 ऑगस्ट 2019 शासनपत्राद्वारे स्थगीत झाली ते पत्र रद्द करून भरती स्थगिती उठवावी असे ठरले, यासाठी मा. मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊन पुढील बैठकीत निर्णय जाहीर होईल तसेच केंद्र सरकारची बिंदू नामावली महाराष्ट्रात लागू करण्यास सकारात्मक चर्चा झाली, याबाबत देखील एकमत झाले व 8 जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी देखील उपसमितीद्वारे लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट देण्यात येत नसल्यामुळे अनेक जिल्ह्यात महसूल अधिकाऱ्याच्या तक्रारी आहेत त्यावर चर्चा होऊन, विभागीय आयुक्तांना त्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आला. सदर बैठकीला मा. आमदार भोंडेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव मा. सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे तसेच मा. प्रकाशजी शेंडगे, मा. चंद्रकांत बावकर, ऍड. पल्लवी रेणके, मा. हरिभाऊ राठोड, अरुण खरमाटे व ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी तसेच उच्च तंत्रज्ञान शिक्षण सचीव, महसूल सचीव, सर्व विभागीय मागासवर्गीय आयुक्त, व समाज कल्याण विभाग, ओबीसी मंत्रालयाचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार