सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जय श्रीराम लिहून आल्याने जय भवानी, जय शिवाजी लिहून पाठवणार.. पवार

भारतीय जनता युवा मोर्चाकडून शरद पवार यांना पाठवण्यात येणाऱ्या १० लाख पत्रांना उत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रे पाठवली जाणार आहेत.

Snehal Joshi .
  • Jul 23 2020 5:20PM
अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन सोहळा होणार आहे. केंद्र सरकारनं नुकतीच या सोहळ्याची तारीख निश्चित केली. देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी लगेचच केंद्र सरकारला चिमटा काढला होता. 'मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काही वाटतं. पण आमचा प्राधान्यक्रम वेगळा आहे,' असं शरद पवार म्हणाले होते. त्यावरून बराच वाद झाला. भाजप नेत्यांनी पवारांवर टीकाही केली. पवारांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या हिंदुत्ववादी शिवसेनेला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही घेरले होते. आता त्यापुढं जाऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या या खेळीला उत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी, जय शिवाजी' असं लिहिलेली २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा केली होती. त्यास नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्याचा निषेध म्हणून ही पत्रे पाठवली जाणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही माहिती वृत्तसंस्थाना दिलेली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार