सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सूट न देता लोकडॉऊन कडक करावा; खासदार डॉक्टर हिना गावित यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

खासदार डॉक्टर हिना गावित यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

Nandurbar. MH
  • Apr 2 2021 4:54PM
नंदुरबार - सूट न देता लोकडॉऊन कडक करावा तसेच रॅमडीसीवर इंजेक्शनची जादा दराने चाललेली विक्री थांबवावी; अशी मागणी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आज दिनांक २ एप्रिल २०२१ रोजी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी कोविड-१९ च्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड वाढविणे व वाढीव आरोग्य कर्मचारी भरती करणे तसेच लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोविड-१९ संक्रमणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यात ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. परंतु जिल्ह्यातील वाढती कोविड-१९ रुग्ण संख्या बघता ऑक्सिजन बेड आज जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोविड-१९ रुग्णांची गैरसोय होत आहे. सदर कारणामुळे अनेक रुग्णांना जिल्ह्याबाहेर उपचारासाठी जावे लागत आहे. परंतु गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय शिवाय पर्याय उरलेला नाही. असे अनेक कोविड-१९ रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वेळप्रसंगी जीव गमवावा लागत आहे.              
        त्याकरिता नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रशासनाने ऑक्सीजन बेडची संख्या तातडीने वाढविणे अत्यंत आवश्यक असून तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता पाहता वाढीव आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी महोदय यांना सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण घरीच उपचार घेऊन मृत्युमुखी पडत आहेत.   
        दिवसेंदिवस वाढणारी कोविड-१९ रुग्ण संख्या लक्षात घेता लॉकडाऊन आदेशात कुठलीही सवलत न देता काही दिवस कडक अंमलबजावणी केल्याशिवाय कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावावर नियंत्रण होणार नाही.असे खा.डॉ.हिना गावित यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. तसेच रेमडीसीवर हे इंजेक्शन उपलब्ध होत नसून ज्यादा दराने उपलब्ध होत आहे. त्याबाबत आवश्यक उपाययोजना करावी व जिल्ह्यात/शहरात संध्याकाळनंतर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त वाढवून विनामास्क फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असूनही ते दिसून येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे याबाबत प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी.
         कोविड-१९ चा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषता रेल्वे कर्मचारी व अधिकारी नेहमी जनतेच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे रेल्वे येथील हॉस्पिटल व विविध समाजाचे मंगल कार्यालय उपलब्ध करून तेथे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी.असे खा.डॉ.हिनाताई यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार