सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉडाऊन नाही, मात्र नवे निर्बंध आणि सूचना :महापौर मुरलीधर मोहोळ

लॉडाऊन नाही, मात्र नवे निर्बंध आणि सूचना

Sudarshan MH
  • Feb 21 2021 5:32PM
                            
 प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे . पुणे शहादत गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा,व महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याची सूचना पुणे महानगर पालिका द्वारा देण्यात आल्सा आसुन . त्यानुसार दि. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत निर्णय घेतला येई अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे
 
ते म्हणाले की पुणे शहरातील खासगी रुग्णालयांचे कोविडसाठीचे बेडस् जे आधी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. ते पुन्हा उपलब्ध करुन देण्याची सूचनाही या बैठकीत केली. तसेच NIV मध्ये असलेली टेस्टिंग कॅपसीटीची अडचण लक्षात घेऊन ही क्षमता वाढवण्याबाबत तातडीने विचार व्हावा. कारण मागील वेळी आलेल्या अनुभवानुसार दोन-तीन दिवस जर अहवाल यायला लागले तर संसर्ग वाढू शकतो, याबाबतची चर्चाही बैठकीत करण्यात आली आसुन.त्याच बरोबर मायक्रो कंटेन्मेंट झोनच्या बाबतीत लवकर निर्णय घेतला जात असून त्याबबतही आदेश पारित केले जाणार आहेत.
 
आणि दाटवस्तीत छोटे दवाखाने गेल्या वेळी बंद ठेवले गेले. काहींनी नक्कीच जबाबदारीचं भान राखत उत्तम कामगिरी बजावली. पण वस्तीत छोट्या दवाखाण्यांचा नागरिकांना मोठा आधार असतो. त्यामुळे असे दाखवणे सुरु राहतील याचीही सूचना बैठकीत दिली.
 
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ २०० जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार नाही. मात्र मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे.
 
शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे.
 
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावरील महापालिकेचा सविस्तर आदेश लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
 
शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून आपणही रात्री ११ नंतर घराबाहेर पडणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार