सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजीनामा तर मुख्यमंत्र्यांनी द्यावा-- निलेश राणे ट्विट

भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे. 'अब बेबी पेंग्विन तो गियो... इट्स शो टाइम' असं त्यांनी म्हटलं आहे. #JusticeForSSR असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Snehal Joshi .
  • Aug 20 2020 2:16PM
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपा नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा मागितला पाहिजे. आंधळा आणि बहिरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसांत कोण दबाव टाकत होतं. तसेच एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे, असं निलेश राणे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार