सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विखे पाटील पिता पुत्रांकडून मला संपवण्याचा प्रयत्न; रावणाचा अंत झाला, तुम्ही कोण आहात? - निलेश लंके

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Shruti Patil
  • Mar 30 2024 9:39AM

जामखेड: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघामध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे उभे राहणार आहे. लंके यांनी सुपा येथे आयोजित बैठकीत विखे पिता - पुत्रावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी निलेश लंके म्हणाले, की विखे पाटील पिता - पुत्रानी मला संपविण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावले. त्यांचे पीए स्वत:चे पीए ठेवतात आणि पैसे उकळतात. पाच वर्षे खासदार आणि राज्यातील मंत्रिपद असूनही त्यांनी विकास कामे केले नाहीत. एवढ्या काळात एकही वैद्यकीय महाविद्यालय यांनी नगरला आणले नाही. कारण त्यांचे खासगी महाविद्यालय आणि रुग्णालय चांगले चालावे यासाठी ते सरकारी संस्था येऊन देत नाहीत. त्यांनी राजकीय कार्यकाळात चांगलं काम करण्यापेक्षा वाईटचं काम केलं. आपल्या कामाला निधी मिळाला, की अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला. 

आपल्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी मी शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य ठेवले होते. या महानाट्याबद्दल एका पोलिसांनी आपले मत व्यक्त केले होते, तर विखेंनी त्या पोलिसाला निलंबित केले. रावणाचा अंत झाला‌, तुम्ही कोण आहात? अशी ही टीका निलेश लंके यांनी विखे पिता - पुत्रावर केली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार