सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुरानंतर सांगलीला मगर, सापांचा विळखा

महापुरामुळे नदीकाठचे नागरिक विस्थापित झाल्यानंतर मगरीने घराच्या कौलांवर बस्तान मांडल्याचे भीतीदायक चित्र मंगळवारी सकाळी डिग्रज येथे पाहण्यास मिळाले.

Sudarshan MH
  • Jul 28 2021 1:04PM
सांगली : महापुरामुळे नदीकाठचे नागरिक विस्थापित झाल्यानंतर मगरीने घराच्या कौलांवर बस्तान मांडल्याचे भीतीदायक चित्र मंगळवारी सकाळी डिग्रज येथे पाहण्यास मिळाले. मगरीबरोबरच सापांचाही मोठय़ा प्रमाणात आढळ पूरबाधित नागरी वस्तीमध्ये दिसून येऊ लागला आहे.

महापुराचे पाणी नागरी वस्तीतून ओसरू लागताच पूरग्रस्त आपल्या घराकडे परतत असताना मगरी, सापांचा सामना करावा लागत आहे.
नदीकाठाला मगरींचा मोठा वावर असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आता महापुराच्या पाण्यासोबत मगरींचा वावर नागरी वस्तीमध्येही आढळला. याचबरोबर  घोणससारख्या अतिविषारी सापांचाही आढळ पूरबाधित भागामध्ये आढळत आहे. मगर, सापांमुळे पूरबाधित भागामध्ये घबराट निर्माण झाली असून असे प्राणी आढळल्यास तत्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. काही सर्पमित्रही साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार