सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उत्कृष्ट कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील 11 पोलीसांना पदक जाहीर

उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशातून पोलीस आहेत.

Abhimanyu
  • Aug 13 2022 9:13PM
नवी दिल्ली : वर्ष 2022 चे केंद्रीय गृहमंत्री पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी  करणा-या  महाराष्ट्रातील 11 पोलीसांना पदक जाहीर झाले आहे.

 

            केंद्रीय गृहमंत्रालयाकडून  वर्ष  2022 साठी चे "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास" पदक शनिवारी जाहीर कण्यात आले. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचा-यांचा यात समावेश आहे.  

 

            गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरूवात वर्ष  2018 पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास" जाहीर झाले आहेत.

            राज्यातील पोलीसांमध्ये  1) श्री कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त ,  2) श्री प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक,  3) श्री मनोज मोहन पवार, सहाय्यक. पोलीस निरीक्षक, 4) श्री.दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक, 5) श्री अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) 6) श्री अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) 7) श्रीमती राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक, 8) दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक, 9) श्री.सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक, 10) श्री जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक, 11)श्री समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक यांचा समावेश आहे.

 

            यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे 15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशातून पोलीस आहेत.  28 महिला पोलीसांचा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार