सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निवासी आयुक्तांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित

‘घरोघरी तिरंगा’ अभियानास सुरुवात

Abhimanyu
  • Aug 13 2022 9:06PM

नवी दिल्ली : सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरीत करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची सुरुवात झाली.

          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीनेही आजपासून ‘घरो घरी तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत आज कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदनाच्या परिसरात निवासास असणाऱ्या-अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जावून यावेळी निवासी आयुक्तांनी राष्ट्रध्वज वितरीत केले व हे ध्वज आप-आपल्या घरावर लावण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत सदनातील घराघरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकले.यावेळी उपस्थित महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘घरोघरी तिरंगा’,‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ असे नारे दिले व वातावरण देशभक्तीमय झाले होते.

         यावेळी डॉ निधी पांडे यांनी सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा,माहिती अधिकारी अंजू निमसरकर ,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरीत केले.

*महाराष्ट्र परिचय केंद्रातही राष्ट्रध्वजाचे वितरण*

‘घरोघरी तिरंगा अभियानां’तर्गत महाराष्ट्र परिचय केंद्रातही उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांच्या हस्ते कार्यालयातील अधिकारी-कर्मचऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. 

*खाद्य महोत्सवाचे आयोजन*

         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात येत्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र दिनी महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सदनाच्या उपहार गृहात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या खाद्य महोत्सवात सहभागी होत दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या पारंपरिक व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे. या खाद्य महोत्सवात राज्याच्या वैविद्यपूर्ण खाद्य संस्कृतिचे दर्शन घडणार असून या महोत्सवात मोठया संख्येने सहभागी होवून लज्जतदार व्यंजनांचा खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्तांनी केले आहे. या महोत्सवात खादय पदार्थ सशुल्क असतील. 

           

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार