सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर तालुक्याताल बिलमांजरे तसेच बंधारफळी गावात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नवापुर : नवापुर तालुक्यातील बिल मांजरे व बंधारफळी येथे दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान या भागात झाले आहे.

Sudarshan MH
  • Jun 4 2021 11:06AM

वादळीवारा व गारपीट गावांना फटका..!!

नवापुर : नवापुर तालुक्यातील बिल मांजरे व बंधारफळी येथे दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान या भागात झाले आहे. यात वादळी वाऱ्यामुळे दहा ते बारा घरांचे छपरे उडून नुकसान झाले आहे त्याप्रमाणे शेत पिकांचेही नुकसान झाल्याचे समजते. तालुक्यातील काही भागात पाऊस तर काही भागात पाऊस नाही अशी परिस्थिती पाहायला मिळाली नवापूर शहरात ही रिमझिम पाऊस झाला. एकूण वातावरणात गारवा तर काहीसा उकाडा निर्माण झाला आहे.
नवापूर तालुक्यात सोसायटीचा वारा सह पाऊसाने तुरळक हजरी लावली असुन तालुक्यातील बिलमांजरे येथे ७ घराचे पञे उडुन पडझड झाली आहे विजेचे खांब पडले असुन यात सरलाबाई जेष्ठ गावीत यांचे पुर्ण घर,दाऊरुपा गावीत यांचे अर्धे घर,चंद्ररीका रेडत्या कोतवाल पुर्ण घर,जेक्या नुरजी कोतवाल यांच्या घरावर लाईटाचा पोल पडुन पडझड झाली आहे,वण्या बोग्या कोतवाल यांचे पुर्ण घर,शैलुबाई कोतवाल यांचे पुर्ण घर,आत्या इसरीया नाईक यांचे पुर्ण घर सह असंख्य घराचे नुकसान झाले आहे यात  कोणीही ग्रामस्थ जखमी झाले नाही अशी माहीती बिलमांजरे गावाचे सरपंच बाबल्या गावीत यांनी दिले आहे तसेच बंधारफळी येथे बालाजी नंद गावीत व सुरेश बालाजी गावीत यांचे घराचे पञे उडुन गेले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालया कडून मिळालेल्या हवामान अंदाजा नुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती 
   अनेक घराचे पत्रे उडाल्याने घरातील अन्न धान्य  पाण्यात वाहून गेले तर गारपीट मुळे कौलारू घराचे ही मोठे नुकसान झाले असल्याचे माहिती गावकऱ्यांनी दिली आहे
  संपूर्ण तालुक्यात दुपार नंतर  उकाड्याने परिसरातील नागरिक हैराण झाले होते सायंकाळी शहरात आलेल्या रिमझिम पावसाने लोकांना उकाड्याने पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवापूर;- प्रतिनिधी गणेश वडनेरे

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार